Bigg Boss Marathi Suraj Chavan : ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाची झगमगती ट्रॉफी घेऊन प्रेक्षकांचा लाडका ‘गुलीगत किंग’ आज पहिल्यांदाच त्याच्या मोढवे गावी गेला. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या घराघरांत सूरजला मोठ्या प्रमाणात प्रेम मिळालं. ग्रँड फिनालेला सुद्धा त्याला भरभरून वोटिंग करण्यात आलं आणि याची पोचपावती सूरजला ट्रॉफीच्या रुपात मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा मला गावची आठवण येतेय असं सूरज म्हणायचा. अखेर ७० दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा रीलस्टार त्याच्या गावी परतला आहे.

सूरज मोढवे गावचा आहे पण, ट्रॉफी घेऊन आधी खंडोबाला जाणार हे त्याने आधीच मनात पक्क ठरवलं होतं. अगदी ‘बिग बॉस’च्या घरात देखील सूरजने सर्वात आधी जेजुरीला जाईन असं वक्तव्य केलं होतं. अखेर त्याने प्रेक्षकांना दिलेला शब्द खरा ठरवला आहे. जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन त्यानंतर मोरगावच्या मोरेश्वराचे आशीर्वाद घेऊन सूरज आपल्या मोढवे गावी पोहोचला.

A teacher of a school in Pune brutally beat up a student of class 6 Pune news
शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Meet who is MBBS Dr Pinki Haryana
Who is Pinki Haryan : इच्छा तिथे मार्ग! भिक्षा मागणारी मुलगी बनली डॉक्टर, झोपडपट्टीत राहिलेल्या पिंकीची यशोगाथा तुम्हालाही देईल प्रेरणा!
Student told Hilarious Math Full Form funny Answer
MATHS चा फुल फॉर्म माहितेय? विद्यार्थ्याने दिले भन्नाट उत्तर, पाहा Viral Video
Zilla Parishad school Viral Video
“इथे शिक्षणावर प्रेम केलं जातं…” जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नाचत नाचत गायलं पावसाचं गाणं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक
Kerala Ban On Digital Notes
Kerala Ban On Digital Notes : आता पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार नाही मुलांचा गृहपाठ, डिजिटल स्वरुपातील नोट्सवर बंदी; ‘या’ राज्याने घेतला निर्णय!
teacher, teacher latest news, Wardha,
‘तुमचे नुकसान भरून काढू, पण एक दिवस सुट्टी घेऊ द्या’, शिक्षक करताहेत विनंती
Mamata Banerjee Said This Thing
Mamata Banerjee : “मला पदाची चिंता नाही, तुमची…”, आंदोलनकर्त्या डॉक्टरांना काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

हेही वाचा : सूरजने ‘ते’ शब्द खरे ठरवले! Bigg Boss ची ट्रॉफी घेऊन आधी गेला जेजुरीला, नंतर बारामतीत जंगी स्वागत, पाहा व्हिडीओ

सूरजचं मोढवे गावी जंगी स्वागत

गावी गेल्यावर सूरजचं ( Bigg Boss Marathi ) जंगी स्वागत करण्यात आलं. गुलालाची उधळण करत या गुलीगत किंगची गावकऱ्यांनी विजयी मिरवणूक काढली. यावेळी ‘झापुक झुपूक’ म्हणत सूरजने डीजेच्या गाण्यांवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. भव्य मिरवणुकीनंतर गावी पोहोचल्यावर सूरजने सर्वात आधी आपल्या शाळेला भेट दिली.

सूरजचा मोढवे गावच्या शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी त्याला पाहून जल्लोष करत होते. सर्वांना उद्देशून सूरज म्हणाला, “बाळांनो खूप शिका, मला शिक्षण मिळालं नाही कारण, मी गरीब होतो. कालांतराने संधी मिळाली त्यानंतर मलाच शिक्षणाची आवड राहिली नाही. इच्छाच नव्हती…मग, मी पळून डोंगरावर जायचो. तुम्ही असं करू नका.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi संपल्यावर निक्की-अरबाज एकत्र! शेअर केला पहिला सेल्फी; फोटो अन् कॅप्शन पाहून नेटकरी म्हणाले, “बाई…”

हेही वाचा : रितेश भाऊंचा फुल्ल सपोर्ट! सूरज चव्हाणची भविष्यात आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय; दिली ‘ही’ खास भेट

दरम्यान, गावात सर्वांची भेट घेऊन आता सूरज पुन्हा एकदा कामानिमित्त मुंबईला परतला आहे. आता लवकरच त्याचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच केदार शिंदेंनी देखील सूरजसाठी नव्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाची घोषणा केली आहे.