Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात प्रेक्षकांना एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. निक्कीच्या ‘ए’ टीममध्ये फूट पडली आहे. निक्की-अरबाजमध्ये अभिजीतवरून वाद झाले आहेत. तर, निक्की-वैभवमध्ये इरिनावरून जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी निक्कीने रागाच्या भरात जेवणाच्या ताटाला लाथ देखील मारली. यामुळे सध्या सोशल मीडियावर निक्की विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी निक्कीबद्दल संतप्त पोस्ट शेअर करत रितेश देशमुखकडे ( Bigg Boss Marathi ) आज निक्कीची शाळा घ्यावी अशी मागणी केली आहे. याशिवाय निक्कीने आर्याचा देखील जेवणावरून अपमान केला. हा अपमान केल्यावर सर्वांना मोठमोठ्याने ओरडून निक्की, “मी या घराची मालकीण आहे” असं सांगत होती. आता याबाबत सुरेखा कुडची त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…

girlfriend boyfriend conversation makeup joke
हास्यतरंग : फसवणूक…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
girlfriend conversation you are beautiful joke
हास्यतरंग : सुंदर आहेस…
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
two friends conversation brother got arrested
हास्यतरंग : अटक केली…
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
husband and wife conversation english joke
हास्यतरंग : इंग्रजी चांगलं…

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video : जेवणाच्या ताटाला निक्कीने लाथाडलं; तर, आर्याचा केला अपमान; नेटकरी संतापून म्हणाले, “हे संस्कार, काय भाषा…

सुरेखा कुडची यांची पोस्ट

मालकीण…

निक्की अगं ते घर सर्वांचं आहे. तू मालकीण नाहीयेस… आणि काय गं तू म्हणशील ती पूर्व दिशा का? तुझ्या कॅप्टन्सीच्या वेळेस तुझं सर्वांनी ऐकायचं का तर तू सगळ्यांशी नीट वागते म्हणून आणि अंकिता कॅप्टन असताना तू किती छळलंस गं सगळ्यांना… आठवत नाही का बाईई… नुसता तोंडाचा पट्टा चालू असतो. दुसऱ्या मॅडम काय शांत झाल्यात वाटतं कल्पना दिली असावी प्रकरण तापलंय शांततेत घे म्हणून… उद्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतोय… भाऊचा धक्का… या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला या घरात स्थान नाही.

दरम्यान, सुरेखा कुडची यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील सहमती दर्शवली आहे. “आता रितेश भाऊ काय बोलतात पाहावं लागेल”, “निक्की झोपेतून उठते आणि भांडते”, “रितेश भाऊ जरा धक्के द्यायला चालू करा” अशा कमेंट्स सुरेखा यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

bigg boss marathi
Bigg Boss Marathi – नेटकऱ्यांच्या कमेंट्स

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, कूर्गमध्ये अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

दरम्यान, या शिवाय यंदाच्या आठवड्यात ( Bigg Boss Marathi ) अभिजीत, इरिना, वैभव व आर्या हे चार सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट आहेत. आता यांच्यापैकी घराचा निरोप कोण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader