Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला. गेल्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये निक्की पॅडीला ‘जोकर’ म्हणाली होती. तर, हा टास्क संपल्यावर जान्हवीने पॅडीच्या अभिनयावर बोट ठेवत त्याचा अपमान केला होता. जान्हवीच्या या वक्तव्यानंतर तिच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती.

नेटकऱ्यांसह मराठी कलाकार जान्हवीवर टीका करत आहेत. अनेकांनी ‘कलर्स मराठी’, रितेश देशमुख यांना टॅग करत येत्या भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला अद्दल घडवण्याची मागणी केली होती. अखेर भाऊचा धक्का सुरू झाल्यावर रितेशने प्रेक्षकांचं म्हणणं खरं करून दाखवलं. संतापलेल्या रितेशने जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर बसायचं नाही आतापासून तुमची जागा बाहेर असं म्हणत जेलमध्ये टाकलं.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “मी रितेश देशमुख आहे! मला हलक्यात…”, अरबाजला दिली सक्त ताकीद; नेमकं काय घडलं?

जान्हवीसाठी ‘बिग बॉस’च्या घरातील गार्डन परिसरात जेल उभारण्यात आला आहे आणि रितेशने दिलेल्या आदेशानुसार आता पुढचा आठवडा जान्हवीला या जेलमध्ये राहावं लागणार आहे. तिला चांगलीच अद्दल घडवल्याने अभिनेत्री व ‘बिग बॉस’च्या यापूर्वीच्या पर्वात सहभागी झालेल्या अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी याबद्दल रितेशचं भरभरून कौतुक केलं आहे.

सुरेखा कुडची यांची पोस्ट

लव्ह यू रितेश भाऊ…

आज शांतपणे झोप लागेल… भावा आज प्रत्येकाला त्याची जागा दाखवून दिलीत… प्रत्येकाच्या चुका दाखवून दिल्या… त्याबद्दल धन्यवाद… याचीच वाट पाहत होतो… घरातल्या कुठल्याही सदस्याशी माझं वैयक्तिक भांडण नाही पण, जे दिसत होतं ते खूपच वाईट होतं..

तुम्ही जेव्हा म्हणालात की, अरबाज – निक्की आणि ती बाहेर बसलेली जिचं नावही तुम्हाला घ्यायची इच्छा नाही. ते तिघं तुम्ही बोलत असताना हसत असतात हे खरं आहे. तुम्ही दिलेलं उत्तर लई भारी “मी रितेश विलासराव देशमुख आहे मला हलक्यात नाही घ्यायचं…”

‘ए’ टीमला त्यांच्या चुकांबद्दल ऐकवणं गरजेचं होतं… आणि ते तुम्ही योग्य शब्दातून त्यांना ऐकवलंत… बाकी ‘बी’ टीमची तारीफ करावी असंच ते खेळले आहेत… असा भाऊचा धक्का पाहायला नक्की आवडेल… love you ritesh bhau

हेही वाचा : Bigg Boss Marathi : जान्हवीला टाकलं जेलमध्ये! “तुमची जागा बाहेर”, म्हणत रितेश देशमुखने केली मोठी शिक्षा; संतापून म्हणाला, “यापुढे…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

दरम्यान, आता जान्हवीला दिलेली शिक्षा कधीपर्यंत चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय इरिना, अभिजीत सावंत, आर्या जाधव आणि वैभव चव्हाण या नॉमिनेटेड सदस्यांपैकी घराबाहेर कोण जाणार हे आजच्या ( २५ ऑगस्ट ) भागात स्पष्ट होणार आहे.

Story img Loader