Bigg Boss Marathi Arbaz Patel Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून नुकताच अरबाज पटेल एलिमिनेट झाला. गेल्या आठवड्यात वर्षा, सूरज, निक्की, जान्हवी आणि अरबाज असे एकूण पाच सदस्य घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. यापैकी सर्वात कमी मतं मिळाल्याने अरबाजला या घराचा निरोप घ्यावा आहे.

अरबाज घराबाहेर झाल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पाडण्यात आला. तो पहिल्या दिवसापासून निक्कीबरोबर खेळत असल्याने प्रेक्षकांमध्ये अरबाजबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. अखेर अरबाज पटेल एलिमिनेट झाल्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत, मीम्स बनवत आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली. यासंदर्भात अनेक मराठी कलाकारांनी सुद्धा प्रतिक्रिया देत अरबाजच्या बाहेर जाण्यासाठी निक्कीला जबाबदार ठरवलं आहे.

Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
thane Chinese manja loksatta news
ठाण्यात चिनी मांजाच्या जप्तीसाठी दुकानात धाडी, पालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
Elephants go to the market dogs bark Elephant greets curious dog with angry stare charges towards it Hilarious viral video
“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल

हेही वाचा : अरबाज झाला Eliminate! निक्की ढसाढसा रडली…; Bigg Boss Marathi च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

सुरेखा कुडची यांची पोस्ट

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेल्या लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा कुडची यासंदर्भात लिहितात, “अरबाज घराबाहेर पडल्याचा आनंद बऱ्याच लोकांना झाला असला तरी, मला वाटतं निक्की जायला हवी होती… निक्की फक्त अरबाजच्या जीवावर नाचत होती… अरबाजच चांगला खेळत होता… राग, चिडचिड हे सगळं त्या घरात होतंच. पण, तो चुकला ते… निक्कीच्या नादी लागून”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : अरबाज पटेल

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “बिग बॉसने निक्कीला गुलीगत धोका…”, अरबाज Eliminate झाल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस; वाचा भन्नाट प्रतिक्रिया

हेही वाचा : Devara Part 1 trailer : “डर को समझना है तो ‘देवरा’ की कहानी सुनो…” ज्युनियर एनटीआरच्या बहुचर्चित सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान, सुरेखा कुडची यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अरबाज निक्कीचा बैल होता”, “अरबाजने कधीच कोणाचा अपमान केला नाही… खरंच निक्की जायला पाहिजे होती बाहेर”, “सुरेखाताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण, अरबाज गेला तेही चांगलं आहे”, “एकदम बरोबर सुरेखा ताई” अशा कमेंट्स त्यांच्या या पोस्टवर आल्या आहेत.

दरम्यान, अरबाज पटेल घरातून एलिमिनेट झाल्यावर निक्की घरात ढसाढसा रडत होती. जवळचा मित्र बाहेर गेल्याने ती पूर्णपणे बिथरल्याचं पाहायला मिळालं. आता इथून पुढचा खेळ निक्की कसा खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच अरबाज घराबाहेर आल्यावर त्याच्या प्रवासाविषयी काय बोलणार याबद्दल देखील सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Story img Loader