Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गेल्या आठवड्यात जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेच्या अभिनय क्षेत्रातील करिअरवर बोट ठेवत त्याचा अपमान केला होता. यामुळे तिच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. यानंतर जान्हवीने रडून पॅडीची माफी देखील मागितली होती. परंतु, या सगळ्या प्रकारामुळे जान्हवीला भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने जेलमध्ये टाकलं. संपूर्ण आठवड्यासाठी तिला जेलमध्ये राहण्याची शिक्षा देण्यात आली.

रितेश देशमुखने “तुम्हाला आठवडाभर जेलमध्ये राहावं लागेल” अशी सक्त ताकीद भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला दिली. यानुसार अभिनेत्री गेल्या पाच दिवसांपासून जेलमध्ये राहत आहे. परंतु, जेलमध्ये राहून सुद्धा जान्हवीमध्ये काहीच फरक पडला नसल्याचं मत अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत मांडलं आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…

surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
aarya jadhao first post after Elimination
Bigg Boss Marathi तून बाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “निक्कीला…”
bigg boss marathi nikki and arbaz reunite after huse fight
“टीम B ला मस्त मूर्ख बनवलं…”, निक्की-अरबाज पुन्हा आले एकत्र! ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; ‘असा’ आहे गेमप्लॅन
Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar mother and wife expressed their anger for Patal Lok Task
Video: “संचालक चुकीचे…”, धनंजय पोवारच्या आई व पत्नीच्या संतप्त भावना, म्हणाल्या, “जीव तोडून २७ नाणी गोळा केली…”
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “टीम B ला मस्त मूर्ख बनवलं…”, निक्की-अरबाज पुन्हा आले एकत्र! ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; ‘असा’ आहे गेमप्लॅन

जान्हवी किल्लेकरसाठी सुरेखा कुडची यांची पोस्ट

मला तरी असं वाटतंय…

जान्हवीला ज्या कारणासाठी जेलमध्ये टाकलं आहे. यामुळे तिच्या वागण्यात काही फरक जाणवतोय का? फरक इतकाच आहे की, आधी वर्षा ताई आणि पंढरीनाथला बोलायची आता निक्कीला बोलतेय… बाकी, बोलणं तसंच, माज तोच बॉडी लँग्वेज तशीच… आणि इतकी मैत्री की, निक्की जेव्हा हिच्याशी बोलत नव्हती तेव्हा हिच आहे ना जिने तिच्या उशीवर बदाम (हार्ट) काढून त्यात लव्ह यू निक्की लिहिलं होतं. मिस यू लिहिलं होतं… नंतर गळ्यात गळे घालून पप्प्या घेतल्या होत्या. निक्कीसाठी रडली होती. इतकी घनिष्ठ मैत्री अचानक इतका वाईटपणा… एखादीने माफी मागितली असती… चुकले म्हणाली असती… नाही का???? आजचा एपिसोड नीट पाहा त्यात ती घनश्यामला म्हणाली आहे की डोक्यावर पडला आहेस का लाथ घालू का कंबरेत ते ही पाय उचलून…काय म्हणावे आता…

सुरेखा कुडची यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील सहमती दर्शवली आहे. आता येत्या वीकेंडला जान्हवीची शिक्षा संपणार की नाही? याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. याशिवाय अरबाजने घराचा नियम मोडत तोडफोड केल्याने आता रितेश त्याच्याविरोधात काय बोलणार? अरबाजला आणखी काही शिक्षा होणार का? हे पाहण्यासाठी चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : पाय खेचून लोळवलं, बॉक्स फोडले अन्…; टास्कमध्ये अंकिता-घन:श्याममध्ये मोठी झटापट! अखेर कोणी मारली बाजी?

bigg boss marathi
Bigg Boss Marathi : सुरेखा कुडची यांची पोस्ट

दरम्यान, या आठवड्यात अभिजीत, वर्षा, अंकिता, निककी हे चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. परंतु, व्होटिंग लाइन्स बंद असल्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून यावेळी कोणीही बाहेर जाणार नाही.