Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या निक्की तांबोळीमुळे प्रचंड चर्चेत आहे. घरात पहिल्या दिवसापासून निक्कीचे प्रत्येकाशी वाद झाले आहेत. ती गेमसाठी स्वत:च्या मित्रांबरोबर देखील भांडली आहे. एवढंच नव्हे तर दोन आठवड्यांपूर्वी भाऊच्या धक्क्यावर टीम ‘ए’ ग्रुपमधून निक्की स्वत:हून वेगळी झाली होती. सध्या निक्की आणि अरबाज एकत्र येऊन घरातल्या इतर सदस्यांविरोधात गेम खेळत आहेत. अशातच वर्षा उसगांवकरांची कॅप्टन्सी सुरू झाल्यापासून घरात कोणतंही काम करणार नाही असा पवित्रा निक्कीने घेतला आहे.

नॉमिनेशन टास्कमध्ये सूरजने निक्कीला नॉमिनेट केलं होतं. ही गोष्ट तिला अजिबात पटली नव्हती. त्यामुळे ती वर्षा उसगांवकरांना याविषयी जाब विचारून सूरजने चुकीच्या निकषांवर मला नॉमिनेट केल्याचं त्यांना सांगते. परंतु, वर्षा उसगांवकर नॉमिनेशन आणि काम न करणं या दोन गोष्टींचा उगाच संबंध जोडू नकोस असं निक्कीला सांगतात. “तुम्हाला माझं ऐकायचं नसेल, तुम्ही माझ्यासाठी स्टॅण्ड घेतला नाही त्यामुळे मी घरातलं एकही काम करणार नाही. मी वॉशरुम ड्युटी करणारच नाही” अशी भूमिका निक्की घेते. हा सगळा ड्रामा पाहून घरात मी बनवलेलं जेवण निक्कीला द्यायचं नाही. तिला हवं तर करून खाईल नाहीतर अरबाज देईल. असं जान्हवी सगळ्या घरासमोर निक्कीला सांगते आणि इथूनच दोघींमधले वाद नवीन टोक गाठतात.

Surekha Kudachi
“लग्न फार उशिरा…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या, “फार अपेक्षा…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Mahavikas Aghadi News
MVA : काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर, “लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या..”
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
Elephants go to the market dogs bark Elephant greets curious dog with angry stare charges towards it Hilarious viral video
“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल

हेही वाचा : Quiz : छोट्या पडद्यावर वादग्रस्त ठरणाऱ्या Bigg Boss Marathi शोबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? सोडवा ‘हे’ १० प्रश्न

गेल्या दोन दिवसांपासून निक्कीचा ( Bigg Boss Marathi ) सगळा मनमानी कारभार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता यावर अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपलं स्पष्ट मत मांडत अभिनेत्री नेमकं काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…

Bigg Boss Marathi : सुरेखा कुडची यांची पोस्ट

“ही निक्की कालच्या एपिसोडपासून डोक्यात गेलीच होती आज तर कहरच केला. गेममध्ये किती फालतुगिरी करते… चौकटीच्या बाहेर जायचं नव्हतं तरी गेली आणि गेम थांबवावा लागला. बरं दुसरं कोणी सांगायला जातं तर ऐकून पण घ्यायचं नाही. स्वत:चंच खरं करायचं. बघावं तेव्हा त्या अरबाजच्या अंगावर पाय टाकून बसलेली असते. असो आपण कितीही बोंबललो तरी ‘बिग बॉस’ निक्कीला ना शिक्षा करणार, ना बाहेर काढणार…कंटेंट देतेय ना… शी शी लाज काढलीये या बाईईईने”

हेही वाचा : ‘झिम्मा २’ नंतर हेमंत ढोमेचा लवकरच येणार नवा चित्रपट, अभिनेत्याने स्वतःच्या गावात अन् शेतात केलंय चित्रीकरण

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : सुरेखा कुडची यांची पोस्ट

दरम्यान, असंख्य नेटकऱ्यांनी पोस्ट शेअर करत निक्कीच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय सुरेखा कुडची यांच्या पोस्टवर “निक्कीला पहिले बाहेर काढा”, “या आठवड्यात हिला जेलमध्ये टाकायला पाहिजे”, “BIGG BOSS निक्कीला पाठिशी घालतंय ती कशीही नियम बाह्य वागतेय तरी तिला शिक्षा होत नाही” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.

Story img Loader