Bigg Boss Marathi Nomination : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवसापासून संपूर्ण घर ‘टीम ए’ व ‘टीम बी’ अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. परंतु, गेल्या आठवड्यापासून सदस्यांमध्ये असलेल्या मैत्रीचं समीकरण काहीसं बदललं आहे. आता ‘ए’ टीममध्ये उभी फूट पडली असून निक्की तिच्या मित्रमंडळींपासून दूर झाली आहे. जान्हवी, वैभवशी निक्की आता पूर्वीसारखं बोलत नाही. आजच्या नॉमिनेशन टास्कमध्ये, तर वैभवने चक्क निक्कीला नॉमिनेट केल्याचं पाहायला मिळालं.

‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदाच थेट नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. यापूर्वीच्या टास्कमध्ये सदस्यांनी खेळ खेळत, जोड्या बनवत, प्लॅनिंग करत आणि शेवटच्या टास्कमध्ये गुप्त पद्धतीने आपल्याला घरात नको असणाऱ्या सदस्यांना नॉमिनेट केलं होतं. परंतु, यावेळी ‘बिग बॉस’ने प्रत्येकाला थेट समोरासमोर नॉमिनेट करण्याची संधी दिली होती. यानुसार या आठवड्यात तीन-चार नव्हे तर एकूण सात सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
husband wife conversation salary joke
हास्यतरंग : तुमचा पगार…
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Job
Job Application : “काम कब करेगा?”, बॉसने गिटार वाजवतो, मॅरेथॉनमध्ये धावतो म्हणून नाकारली नोकरी; COOची पोस्ट चर्चेत
Maharera decided to limit self regulatory body representatives tenure
मक्तेदारी मोडीत काढून टाकण्यासाठी महारेराने घेतला मोठा निर्णय

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “तिचं व्यक्तिमत्व, वागणं मला आवडलं नाही…”, घराबाहेर आलेली इरिना निक्कीबद्दल काय म्हणाली?

Bigg Boss Marathi : ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट

‘बिग बॉस’च्या घरात या आठवड्यात घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत हे सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. या टास्कमध्ये बराच गोंधळ पाहायला मिळाला. “तुमच्या मते या खेळात असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या सदस्यांना नॉमिनेट करा” असे आदेश ‘बिग बॉस’कडून देण्यात आले होते. यानुसार प्रत्येकाने येऊन आपली मतं नोंदवली आणि घरात नको असणाऱ्या दोन सदस्यांचे फोटो फाडले. यात सर्वाधिक फोटो फाडलेल्या सात सदस्यांच्या नावाची नॉमिनेटेड स्पर्धक म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा : थ्रिलर हिंदी चित्रपटात एकत्र झळकणार रितेश देशमुख अन् प्रिया बापट! पहिली झलक आली समोर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Bigg Boss Marathi Nomination
Bigg Boss Marathi Nomination : नेटकरी अंकिता वर्षावर नाराज

दरम्यान, हा टास्क संपल्यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टीम बीच्या खेळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्ती केली आहे. या टास्कमध्ये अंकिताने सूरजला नॉमिनेट केलं. तर, वर्षा उसगांवकरांनी सूरज आणि धनंजयला नॉमिनेट केल्यामुळे नेटकरी नाराज झाले आहे. “अंकिता आणि वर्षा आपल्याच लोकांना नॉमिनेट करत आहेत”, “टीम बी हा कोणता गेम सुरू आहे?”, “अंकिता तू आज सुरजला नॉमिनेट करण्याचा निर्णय चुकीचा घेतला आहे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आता या सात जणांमध्ये घराबाहेर कोण जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader