Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरात होणाऱ्या भांडणांमुळे या सीझनची पहिल्या दिवसापासून सर्वत्र चर्चा रंगली आहे. विशेषत: अनेकजण निक्की-अरबाजच्या खेळीवर नाराज आहे. याबाबत रितेश देशमुखने देखील भाऊच्या धक्क्यावर दोघांनाही कडक शब्दांत समजूत दिली आहे. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाल्याचं दिसत नाही. निक्कीने घरात केलेली चुकीची वक्तव्य, काम करण्यास दिलेला नकार या सगळ्या गोष्टींना अरबाज खतपाणी घालत असतो. त्यामुळे गेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेशने अरबाजला ‘निक्कीचा डोअरमॅट’ असं देखील म्हटलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबाज टास्कमध्ये दुसऱ्याचा विचार न करता अग्रेसिव्हरित्या खेळतो असा दावा घरातील अनेकांनी केला होता. त्यामुळे वाइल्ड कार्ड आलेल्या संग्राम चौगुलेने अरबाजला खुलं आव्हान दिलं होतं. कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये संग्राम – अरबाज भिडल्यावर नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लागलं होतं. अखेर या लढाईत अरबाजच्या ‘टीम ए’ने बाजी मारली.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “मराठी जनता तुला ओळखत नव्हती, म्हणून…”, जान्हवीचं निक्कीला ओपन चॅलेंज; म्हणाली, “दम असेल तर…”

अरबाजच्या खेळाचं कौतुक

अरबाज संपूर्ण टास्क चपळतेने खेळला. मात्र, जान्हवी, अभिजीत, पॅडी अशा अनेक सदस्यांवर त्याने बळाचा वापर केल्याचं देखील पाहायला मिळालं. तरीही पहिल्यांदाच तिसऱ्या पर्वातील एका स्पर्धकाने अरबाजच्या खेळाचं कौतुक केलं आहे.

तृप्ती देसाई या ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. जवळपास दीड महिना त्या बिग बॉसच्या घरात होत्या. अरबाजचा खेळ पाहून त्यांनी पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. “काहीही म्हणा आज अरबाज खरोखरच खूप छान खेळला… संग्रामची शक्ती खूप कमी पडली अरबाजच्या युक्ती आणि खेळापुढे…” अशी पोस्ट शेअर करत तृप्ती देसाई यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “जाणीवपूर्वक हिंसा निंदनीयच…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, “मनाने खंबीर…”

Bigg Boss Marathi : तृप्ती देसाईंची पोस्ट चर्चेत

अरबाजची टीम कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमध्ये जिंकली असली, तरीही अंतिम कॅप्टन बनण्याच्या शर्यतीतून तो पहिल्याच फेरीत बाद झाला. जान्हवीने ‘जादुई हिरा’ उचलत त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. यामुळे जान्हवी आणि अरबाजच्या मैत्रीत आता फूट पडली आहे. याशिवाय अरबाजने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मी यापुढे कोणाला बहीण वगैरे मानणार नाही असं विधान देखील केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi third season contestant praise arbaz patel game read post sva 00