Bigg Boss Marathi Ticket To Finale Task : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आज स्पर्धेच्या दहाव्या म्हणजेच शेवटच्या आठवड्यात घरात ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क पार पडणार आहे. या टास्कसाठी घरात खास बाबागाडी आणण्यात आली आहे. याचा प्रोमो नुकताच ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात आजच्या ( ३० सप्टेंबर ) भागात ‘तिकीट टू फिनाले’चा टास्क पार पडणार आहे. यामध्ये सध्या घरात असणाऱ्या एकूण सात सदस्यांना बाबागाडीवर बसून हा टास्क पूर्ण करायचा आहे. या टास्कला वेळेचं बंधन असणार आहे. बाबागाडीवर फिरताना जो सदस्य कमीत कमी वेळेत हा टास्क पूर्ण करेल तोच या टास्कमध्ये बाजी मारणार आहे.

Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Farah Khan
“शाहरुख कुठे उभा राहील?” शिल्पा शिरोडकरच्या वजनावर फराह खानने केलेली कमेंट; अभिनेत्री म्हणाली…
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
Lakhat EK Aamcha Dada
‘सर्वोत्कृष्ट कुटुंब’ स्पर्धेत डॅडी आणि सूर्या समोरासमोर येणार, ‘लाखात एक आमचा दादा’मधील डॅडी म्हणाले, “निंबाळकर घराण्याच्या इज्जतीचा…”

हेही वाचा : “अभिजीत अरबाजचं सॉफ्ट व्हर्जन, तो चेहऱ्यावर मुखवटा…”, घराबाहेर आल्यावर पंढरीनाथ कांबळेचं मोठं विधान; म्हणाला…

बिग बॉसच्या घरात ‘तिकीट टू फिनाले’ टास्क

सध्या ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात अभिजीत सावंत, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि निक्की तांबोळी असे सात सदस्य आहेत. यांना बाबागाडीवर बसून हा टास्क पूर्ण करावा लागणार आहे. घरातील जो सदस्य हा टास्क कमीत वेळ पूर्ण करेल त्याला तिकीट टू फिनाले जिंकण्याची संधी मिळणार आहे.

bigg boss marathi
Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या तिकीट टू फिनाले टास्क

बाबागाडीवर बसल्यावर हळुहळू पुढे सरकताना घरात सगळ्याच सदस्यांची दमछाक होत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ डीपी या बाबागाडीवरून तोल जाऊन खाली पडतो. वर्षा उसगांवकर सुद्धा या टास्कमध्ये काहीशा थकतात. पण, अंकिता आणि सूरज अतिशय चपळतेने हा टास्क पूर्ण करत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : जान्हवी पुन्हा भडकली! ‘तो’ निर्णय ऐकताच संतापून केली आदळआपट; अभिनेत्रीला अश्रू अनावर

आता ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचं तिकीट टू फिनाले जिंकण्याची संधी नेमकी कोणाला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदा हा शो १०० दिवसांऐवजी फक्त ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. आता येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे.

Story img Loader