Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सध्या अंतिम टप्पा चालू आहे. घरात नुकताच ‘फॅमिली वीक’ टास्क पार पडला. या टास्कनंतर संपूर्ण घराचं वातावरण काहीसं भावुक झालं होतं. यानंतर सगळेजण भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहत होते. पण, रितेश देशमुख शूटिंगसाठी परदेशात असल्याने या आठवड्यात सुद्धा भाऊचा धक्का होणार नाही असं स्वत: ‘बिग बॉस’ने जाहीर केलं.

भाऊचा धक्का या आठवड्यात नसल्यामुळे त्याच्याऐवजी घरात शरद उपाध्ये, अनिल थत्ते, राखी सावंत, अभिजीत बिचुकले या विशेष पाहुण्यांनी एन्ट्री घेतली होती. राखीच्या येण्याने तर निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग चांगलाच उडाल्याचं पाहायला मिळालं. गेले दोन महिने ‘बिग बॉस’ने महाराष्ट्रासह देशभरातील लोकांचं भरभरून मनोरंजन केलं. मात्र, शेवटच्या आठवड्यात या शोच्या प्रसारणाची वेळ बदलणार असल्याचं वाहिनीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत जाहीर केलं आहे.

kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Bigg Boss Marathi Season 5 Fame Akshay Kelkar will get married and share first vlog with future wife
Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
Bigg Boss 18 Edin Rose Yamini Malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
Prajakta Mali
“मी बॉस असणं खूप जणांना खुपलं”, प्राजक्ता माळी म्हणाली, “त्यांनी माझ्याकडे शेवटपर्यंत…”
Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee says who will win the show
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीच्या मते करणवीर मेहरा नाही, तर ‘हा’ सदस्य होणार विजयी; म्हणाला…
Bigg Boss 18 Digvijay Rathee is EVICTED from salman khan show
Bigg Boss 18: फिनालेच्या चार आठवड्यांआधी अचानक ‘हा’ सदस्य घराबाहेर; शिल्पा शिरोडकर, ईशा सिंहला अश्रू झाले अनावर
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार?
Bigg Boss फेम कलाकारांचा नवीन शो सुरू होणार? छोटा पुढारी घन:श्यामने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे मिळाली हिंट

हेही वाचा : Bigg Boss Marathi -“त्या सीझनमध्ये एकाही मुलाला सोडलं नाहीस”, राखी सावंतने केली निक्कीची बोलती बंद; म्हणाली, “आय लव्ह यू बोलून…”

शेवटच्या काही दिवसांसाठी वेळ बदलली

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर बहुप्रतीक्षित महाराष्ट्राची कुलस्वामिनी, ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू होणार आहे. ३ ऑक्टोबरपासून दररोज रात्री ९ वाजता ही मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रसारित केली जाणार आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या ‘आई तुळजाभवानी’ची गाथा या नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. आता ही नवीन मालिका ९ वाजता प्रसारित केली जाणार असल्याने या स्लॉटला सध्या सुरू असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’चं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता.

अखेर ‘कलर्स मराठी’ वाहिनीकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सध्या ‘बिग बॉस’चं पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. येत्या ६ ऑक्टोबरला शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. तर, ‘आई तुळजाभवानी’ ही मालिका ३ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे शेवटच्या फक्त तीन दिवसांसाठी ‘बिग बॉस मराठी’ची वेळ बदण्यात आली आहे. हा शो ३ ते ५ ऑक्टोबर या दरम्यान रात्री ९.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi: तुझं अरबाजवर प्रेम आहे का? सूरज चव्हाणने थेट प्रश्न विचारल्यावर निक्की म्हणाली, “तो मला…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi – प्रसारणाची वेळ बदलली

दरम्यान, शेवटच्या ३ दिवसांसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) प्रसारणाची वेळ बदलणं हे खरंच चुकीचं आहे असं मत काही नेटकऱ्यांनी व ‘बिग बॉस’च्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केलं आहे.

Story img Loader