Bigg Boss Marathi Riteish Deshmukh : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदा या घरात एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश घेतला होता. यापैकी ६ जणांनी ‘बिग बॉस’च्या घराचा निरोप घेतला असून, आता घरात केवळ १० सदस्य आहेत. यंदा पहिल्यांदाच या शोचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करत आहे. भाऊच्या धक्क्यावर अभिनेता घरातील सर्व सदस्यांची शाळा घेत असतो.

रितेश देशमुख सुद्धा ‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi ) या शोचा खूप मोठा चाहता होता. त्यामुळे शोच्या होस्टिंगबद्दल विचारणा झाल्यावर त्याने लगेच होकार कळवला होता. आपल्या व्यग्र शेड्यूलमधून वेळ काढून रितेश या शोचं होस्टिंग करत आहे. गणपतीच्या दिवसांमध्ये देखील अभिनेता खास भाऊच्या धक्क्यावर उपस्थित होता. याशिवाय भाऊच्या धक्क्याला सध्या टीआरपी देखील खूप चांगल्या प्रमाणात मिळत आहे. मात्र, या आठवड्यात पहिल्यांदाच रितेश देशमुख घरातील सदस्यांची शाळा घेण्यासाठी हजर राहू शकणार नाही.

रितेश देशमुख ऐवजी महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या डॉ. निलेश साबळेने या आठवड्यात घरात एन्ट्री घेतली. याशिवाय घरात पत्रकार परिषद देखील पार पडली आहे. रितेश यावेळी का नाही? याबद्दल असंख्य प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात निर्माण झाले होते. एपिसोड सुरू होताच याचं कारण समोर आलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : घनःश्याम दरवडेला ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाण्यासाठी कुटुंबाने दिला होता नकार, मोठ्या बहिणीने सांगितलं कारण, म्हणाली…

रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर अनुपस्थित का राहिला?

रितेश देशमुख या आठवड्यात कामानिमित्त परदेशात असल्यामुळे तो यावेळी भाऊच्या धक्क्यावर दोन्ही दिवस उपस्थित राहू शकणार नाहीये. तसेच या आठवड्यात घरात पत्रकार परिषद देखील पार पडली आहे. घरात एन्ट्री घेतल्यावर निलेश साबळे म्हणाला, “यावेळी भाऊचा धक्का नव्हे तर ‘महाराष्ट्राचा धक्का’ होणार आहे.”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : रितेश देशमुख

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : निक्की जान्हवीला घाबरते का? असं विचारताच दोघी पत्रकारांसमोर भांडल्या; एक म्हणाली, “मी बाहेर…”

दरम्यान, या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज हे पाच सदस्य नॉमिनेट आहेत. आता यांच्यापैकी कोण घराचा निरोप घेणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या धक्क्यावर आल्याबद्दल शेवटी निलेश साबळेचे ‘बिग बॉस’ ( Bigg Boss Marathi ) कडून आभार देखील मानण्यात आले आहेत.