Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच आठवड्यात घरातील स्पर्धकांमध्ये टोकाचे वाद होण्यास सुरुवात झालेली आहे. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकर यांच्यात पहिल्या दिवसापासूनच टोकाची भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

निक्की व वर्षा यांच्यात आता छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊन निक्की अतिशय चुकीची भाषा वापरते असा आरोप वर्षा उसगांवकरांनी घरात केला आहे. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत वर्षा उसगांवकरांचा उल्लेख निक्कीने “काळ्या मनाच्या मॅम, ब्लॅक हार्टेड” असा केला होता. त्यामुळे तिचे हे शब्द वर्षा उसगांवकरांसह अन्य मराठी कलाकारांना सुद्धा खटकले आहेत.

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
girlfriend boyfriend conversation makeup joke
हास्यतरंग : फसवणूक…
two friends conversation brother got arrested
हास्यतरंग : अटक केली…
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
Bigg Boss 18 Bigg Boss angry after Vivian dsena can chum darang refused to accept the ticket to final
Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा! पहिल्याच आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट, पाहा प्रोमो

पुष्कर जोगची पोस्ट

‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाचा उपविजेता व अभिनेता पुष्कर जोगने यासंदर्भात पोस्ट शेअर करत निक्कीबद्दल संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये पुष्कर म्हणतो, “निक्की तुला मॅनर्स कळतात का? मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्रीला असं अपमानित होताना पाहून खरंच खूप वाईट वाटतं. हे अत्यंत खेदजनक आहे. वर्षा उसगांवकर मॅमना अशा पद्धतीने वागवणं चुकीचं आहे. हा खेळ खेळायची एक विशिष्ट पद्धत आहे आणि हा गेम खेळताना आपण आपली मर्यादा सोडून चालत नाही. वर्षा मॅम मी तुमच्याबरोबर आहे.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “अत्यंत लज्जास्पद…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्यामुळे मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख…”

पुष्करने या पोस्टमध्ये ‘बिग बॉस मराठी’सह ‘कलर्स मराठी वाहिनी’ला देखील टॅग केलं आहे. याशिवाय सोशल मीडियावर सुद्धा निक्कीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. आता येत्या रविवारी होणाऱ्या भाऊंच्या पहिल्याच चावडीवर रितेश देशमुख निक्कीची शाळा घेणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : वर्षा अन् निक्कीच्या वादावर मराठी अभिनेत्याची मोजक्या शब्दांत टिप्पणी, पोस्ट शेअर करत म्हणाला…

nikki
Bigg Boss Marathi
pushkar jog
Bigg Boss Marathi : पुष्कर जोगची पोस्ट

दरम्यान, या आठवड्यात अंकिता वालावलकर, योगिता चव्हाण, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण, वर्षा उसगांवकर हे सहा सदस्य घरातून बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. पहिल्याच आठवड्यात कोणत्या स्पर्धकाचा प्रवास संपणार हे आपल्याला येत्या रविवारी कळणार आहे.

Story img Loader