Bigg Boss Marathi Mid Week Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता अंतिम आठवड्याला सुरुवात झालेली आहे. यंदाचं पाचवं पर्व अवघ्या ७० दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यापूर्वीच्या सीझनमध्ये एकूण शंभर दिवसांचा खेळ दाखवण्यात आला होता. मात्र, या पर्वाच्या बाबतीत ‘बिग बॉस’ने मोठा निर्णय घेत दहा आठवड्यांमध्ये हा सीझन संपेल अशी घोषणा घरात केली. भरभरून मनोरंजन करणारा हा शो लवकर बंद होत असल्याने सध्या प्रेक्षकांसह नेटकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे.

घरात दहाव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘तिकीट टू फिनाले’ हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये सूरजला हरवत निक्की तांबोळीने बाजी मारली. यंदाच्या पाचव्या पर्वात ग्रँड फिनालेला जाणारी पहिली सदस्य निक्की तांबोळी ठरली आहे. अरबाजने दिलेल्या म्युचुअल फंड्सच्या कॉइन्समुळे निक्कीला ‘तिकीट टू फिनाले’ची उमेदवारी मिळवता आली. यानंतर एका टास्कमध्ये सूरजचा पराभव करत निक्की ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची पहिली फायनलिस्ट ठरली आहे.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
Ajit Pawar Sharad Pawar Meet in Delhi
Ajit Pawar Sharad Pawar Meet: अजित पवारांची प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवारांशी भेट; कशावर झाली चर्चा? उत्तरादाखल म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार…”
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

हेही वाचा : Bigg Boss Marathi – निक्की तांबोळी ठरली यंदाची पहिली Finalist! अरबाज पटेलच्या कमेंटने वेधलं लक्ष, तर नेटकरी म्हणाले, “हिला फुकटात…”

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी पहिली फायनलिस्ट

निक्की सोडून संपूर्ण घर झालं नॉमिनेट

‘तिकीट टू फिनाले’च्या टास्कमध्ये बाजी मारल्याने या आठवड्यात मिडवीक एलिमिनेशनपासून फक्त निक्की तांबोळी सुरक्षित असणार आहे. तिच्याशिवाय संपूर्ण घर नॉमिनेट आहे. स्पर्धेच्या शेवटच्या आठवड्यात घरातील वर्षा, जान्हवी, धनंजय, अंकिता, अभिजीत आणि सूरज हे सात सदस्य नॉमिनेटेड आहेत. Mid-Week एलिमिनेशन लवकरच पार पडेल असे संकेत ‘बिग बॉस’कडून घरातील सदस्यांना देण्यात आले आहेत.

निक्की सोडून उर्वरित ६ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार कायम राहणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पहिल्यांदाच मिडवीक एलिमिनेशन पार पडणार आहे. आता Mid-Week एलिमिनेशनमध्ये कोण घराचा निरोप घेणार हे व्होटिंगनुसार स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : रणवीर सिंह ‘या’ भूमिकेसाठी माझ्यासमोर बसला होता तीन तास, शक्तिमान फेम अभिनेत्याच वक्तव्य; म्हणाला “त्याच्या चेहर्‍यावर…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – ‘बिग बॉस’च्या घरात आली बाबागाडी…; ‘तिकीट टू फिनाले’साठी रंगणार अनोखा टास्क, ७ सदस्यांमध्ये कोण मारणार बाजी?

Mid-Week एलिमिनेशनसाठी व्होटिंग लाइन्स २ ऑक्टोबर रात्री १०.३० पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहेत. यानंतर घरातील उर्वरित सदस्यांमध्ये ग्रँड फिनालेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला पार पडाणार आहे. आता खेळाच्या या अंतिम टप्प्यावर कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader