Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून वादाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा एकूण १६ स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली आहे. यामध्ये रीलस्टार गुलीगत धोका फेम सूरज चव्हाणचा देखील समावेश आहे. त्याला फारसा गेम न समल्यामुळे घरातील इतर सदस्यांनी त्याला पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट केलं आहे. याशिवाय निर्णय घेण्यासाठी सक्षम नसलेल्या तीन स्पर्धकांमध्ये देखील सूरज चव्हाणची निवड इतर सदस्यांनी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात सूरजला वारंवार टार्गेट करणं योग्य नाही असं म्हणत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. सूरजबद्दलची ही पोस्ट उत्कर्ष शिंदेने शेअर केली आहे. यापूर्वीच्या पर्वात उत्कर्ष स्वत: देखील सहभागी झाला होता. त्यामुळे त्याला हा खेळ खूप चांगला माहिती आहे. आता सूरजला घरात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल अभिनेता नेमकं काय म्हणतोय जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : आता थेट ‘बिग बॉस’ करणार सूरजचा ब्रेनवॉश! ‘गुलीगत किंग’ म्हणत निक्कीला भिडणार, पाहा प्रोमो

उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत

“सूरज तू मोठ-मोठ्या संकटांना हरवून आज इथपर्यंत आला आहेस. तू सच्चा आहेस यांच्या सारखा चेहरे बदलणारा नाहीस. या शिकलेल्या माणसांना ‘माणसाने माणसाशी माणसासारखे’ वागावे हे एवढंही आठवत नसेल तर यांचं शिक्षण चुलीत घाला” अशी पोस्ट उत्कर्षने सूरजसाठी शेअर केली आहे.

सूरज चव्हाण

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “मॅनर्स कळतात का?” निक्कीची वागणूक पाहून पुष्कर जोग संतापला; म्हणाला, “वर्षा मॅमला अशा पद्धतीने…”

सूरज चव्हाणबद्दल ही पोस्ट शेअर करून उत्कर्षने याच्या खाली नुकत्याच प्रदर्शित झालेला बिग बॉसचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये निक्की सूरजला मी तुला माझं खरं रुप दाखवेन असं सांगत धमकी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर उत्कर्ष लिहितो, “तुम सिर्फ डरा सक्ते हो- हरा नहीं सकतें”

उत्कर्ष शिंदेची पोस्ट

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “अत्यंत लज्जास्पद…”, निक्कीने वर्षा उसगांवकरांचा अपमान केल्यामुळे मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख…”

दरम्यान, बिग बॉसच्या घरात यंदाच्या आठवड्यात वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण, योगिता, पुरुषोत्तमदादा पाटील, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता पहिल्या आठवड्यात कोण बेघर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi utkarsh shinde full support to suraj chavan shared post sva 00