Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी नुकताच एक टास्क पार पडला. या टास्कमध्ये ‘टीम ए’मध्ये अरबाज, निक्की, सूरज, धनंजय आणि वर्षा यांचा समावेश होता. तर, ‘बी टीम’मध्ये अंकिता, पॅडी, अभिजीत, जान्हवी आणि संग्राम हे पाच सदस्य होते. त्यामुळे या टास्कमध्ये कोणती टीम बाजी मारणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं.

टास्कच्या पहिल्याच फेरीत अरबाजबरोबर संग्रामने डील केली आणि पूर्ण खेळ बदलून टाकला. पहिल्या डावात अंकिता, पॅडीला सहज बाद करण्यात आलं. यानंतर धनंजयने दुसऱ्या फेरीत जान्हवी, संग्रामला बाद केलं. तिसऱ्या लढतीत संग्रामने टीमच्या बाजूने खेळण्याचा निर्णय घेतला यामुळे या डावात संग्राम-अरबाजमध्ये चांगली लढत पाहायला मिळाली. पण, शेवटी अरबाजने संपूर्ण ताकदीनिशी सर्वांना बाजूला काढलं आणि अभिजीतच्या घरट्यात अंड ठेवून त्याला बाद केलं.

Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
police reaction on saif ali khan attack
“त्याच्या गृहसेविकेबरोबर वाद…”, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

हेही वाचा : अमिताभ बच्चन-जया यांचे आंतरजातीय लग्न लावण्यास भटजीने दिलेला नकार; बिग बींचे सासरे म्हणाले होते, “लग्नाचे विधी…”

‘टीम बी’चे सगळे सदस्य कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कमधून बाद झाल्याने निक्की सोडून संपूर्ण ‘ए टीम’ कॅप्टन होण्याच्या अंतिम लढतीसाठी पात्र ठरली आहे. अरबाजने गेल्या आठवड्यातील टास्क सुद्धा संपूर्ण ताकद लावून एकहाती जिंकला होता. त्यामुळे त्याच्या खेळाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Bigg Boss Marathi : उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेता उत्कर्ष शिंदेने मोजक्या शब्दांची पोस्ट शेअर करत संग्रामला टोला लगावला आहे. तर, अरबाजचं कौतुक केलं आहे. “अरबाज पटेल या मुलामध्ये दम तर आहेच कारण, मिस्टर युनिव्हर्सला धाप लागली” अभिनेत्याच्या या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी कार्यात धक्काबुक्की! घरातील ‘हे’ चार सदस्य टास्कमधून झाले बाद, ‘त्या’ फोटोमुळे झालं उघड

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : उत्कर्ष शिंदे पोस्ट

उत्कर्षने यापूर्वी सुद्धा ‘बिग बॉस’च्या यंदाच्या सीझनबद्दल अनेकदा आपली रोखठोक मतं मांडली आहेत. याशिवाय उत्कर्ष स्वत: तिसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. त्यामुळे घरातील गेम त्याने खूप जवळून पाहिला आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनबद्दल सांगायचं झालं तर, सध्या घरात एकूण पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता अरबाज, निक्की, वर्षा, सूरज आणि जान्हवी यांच्यापैकी कोण घराचा निरोप घेणार हे येत्या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होणार आहे.

Story img Loader