Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा उद्या ( ६ ऑक्टोबर ) पार पडणार आहे. यासाठी रितेश देशमुखने दोन आठवड्यांचा ब्रेक घेऊन भाऊच्या धक्क्यावर पुनरागमन केलं आहे. महाअंतिम सोहळा पार पडण्याआधी यंदा या खेळात सहभागी झालेल्या सगळ्या सदस्यांनी घरात रिएन्ट्री घेतली होती.

यंदाचा सीझन २८ जुलैला ( Bigg Boss Marathi ) सुरू झाला होता. यावेळी घरात एकूण १६ जणांनी प्रवेश घेतला होता. यानंतर काही आठवड्यांनी घरात वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली. अखेर आता हा ७० दिवसांचा प्रवास संपणार आहे. घरात सगळ्या सदस्यांचं रियुनियन झाल्यावर अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance Video
‘झुमका गिरा रे…’, ५९ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर Bigg Boss फेम योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स! पतीची खास कमेंट
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : रितेश देशमुख ग्रँड फिनालेसाठी सज्ज! समोर आला डॅशिंग लूक; २ आठवड्यांच्या ब्रेकनंतर भाऊच्या धक्क्यावर परतला

वैभव अरबाजबद्दल काय म्हणाला?

वैभवने घरात ( Bigg Boss Marathi ) एन्ट्री घेतल्यावर त्याने सर्वप्रथम जान्हवीची भेट घेतली. यावेळी जान्हवी म्हणाली, “मी तुझ्यासाठी अरबाजला कॅप्टन बनवलं.” यावर वैभव म्हणतो, “अरबाज घाणेरडा गेम खेळलाय… घाणेरडा म्हणजे प्रॉपर घाणेरडा गेम खेळला. माझं डोकं कोणत्या लेव्हलला गेलंय… हे मी तुला सांगूही शकत नाही. तो पूर्णपणे फेक माणूस आहे.”

जवळच्या मित्राचं हे बोलणं ऐकून जान्हवी म्हणाली, “आपण B ग्रुपमध्ये असतो, तर वैभव हे सगळे हलले असते आपण दोघंही नक्की टॉप-५ मध्ये असतो. आपली मैत्री चुकली…पण, याचा दोष मी त्यांना नाही देणार…कारण, मी चुकले. तू गेल्यावर मी खेळात एकटी पडले. तुला खूप मिस केलं.”

हेही वाचा : ८ वर्षांत मोडला प्रेमविवाह, दुसऱ्या लग्नाआधी स्वीकारला इस्लाम धर्म; Bigg Boss 18 मध्ये दिसणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता

हेही वाचा : Devara Box Office Collection : ज्युनियर एनटीआरच्या सिनेमाची पहिल्या आठवड्यात जबरदस्त कामगिरी, एकूण कलेक्शन तब्बल ‘इतके’ कोटी

दरम्यान, आज घरात सगळ्या सदस्यांचं रियुनियन झाल्यावर वैभवने अरबाजशी अजिबात संवाद साधला नाही. एवढंच नव्हे तर, ‘बिग बॉस’च्या घरातील पिकनिक स्पॉटवर जाऊन वैभवने मी आता ‘टीम B’मध्ये प्रवेश करतो असं देखील सर्वांसमोर जाहीर केलं. त्यामुळे ‘टीम ए’मध्ये असलेल्या निक्की, अरबाज, जान्हवी आणि वैभव यांच्या चौघांच्या मैत्रीत आता कायमस्वरुपी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. आता सध्या टॉप-६ मध्ये असणाऱ्या सदस्यांपैकी ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader