Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून गेल्या आठवड्यात वैभवने निरोप घेतला. अन्य नॉमिनेट सदस्यांच्या तुलनेत कमी मतं मिळाल्याने त्याला घरातून एक्झिट घ्यावी लागली. पहिल्या दिवसापासून वैभव ‘टीम ए’मधून त्याचा गेम खेळत होता. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. घराबाहेर आल्यावर सुद्धा वैभवच्या पोस्टवर नेटकरी नकारात्मक कमेंट्स करत आहेत. यावर आता इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन घेत अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैभव म्हणाला, “घराबाहेर आल्यावर माझ्या पोस्टवर अनेक नकारात्मक कमेंट्स केल्या जात आहे. माझ्या पोस्टवर “अरबाज २…”, “बैल…” अशा कमेंट्स येत आहेत. मी यावर एवढंच म्हणेन की, ‘अरबाज-२’ हा टॅग मी मान्य करू शकत नाही. कारण, त्याच्या बऱ्याच गोष्टींना मी विरोध दर्शवला आहे. काही गोष्टी टीव्हीवर दिसत नाहीत. त्याच्या आणि माझ्या स्वभावात खूप फरक आहे. माझ्या चुका झाल्यावर मी अनेकांची घरात माफी मागितली आहे. पॅडी दादांच्या मी पाया पडून माफी मागितलीये. वर्षा ताईंशी पण मी चांगलं बोलायचो… त्यामुळे नंतर हे सगळे लोक मला कॅप्टन्सीमध्ये पाठिंबा देत होते.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – निक्कीशी असलेली जवळीक अरबाजच्या आईला खटकली; फरीदा म्हणाल्या, “टीव्हीवर दिसतंय ते लोकांना सुद्धा…”

माझं नाव अरबाज २ नाही – वैभव चव्हाण

वैभव पुढे म्हणाला, “माझं नाव अरबाज – २ नाहीये…माझं नाव वैभव चव्हाण आहे आणि हे टॅग पुसून… मी इथून पुढे नक्कीच स्वत:ला सिद्ध करून दाखवेन. सगळेच मला बैल म्हणत आहेत…पण, शेतकऱ्यासाठी बैल हा महत्त्वाचा असतो आणि हा बैल तुमच्या कधीतरी कामी येईल एवढंच मी सांगेन. आता बैल नाव पाडलंय मला त्यामुळे मी नक्कीच इथून पुढे चांगलं काम करेन. हे आज मी तुम्हा सर्वांना सांगतोय. या टॅगला मी चांगल्या पद्धतीने सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “अरे मध्ये नको बोलूस…”, पंढरीनाथ सूरजवर भडकला, अंकिताने मध्यस्थी केली पण…; प्रोमो पाहून काय म्हणाले नेटकरी?

Bigg Boss Marathi : वैभव चव्हाण

“अरबाज मला आतमध्ये ‘बैल’ म्हणाला असेल तर, आमची बाहेर येऊन नक्कीच भांडणं होतील. मी त्याला याबद्दल विचारेन कारण, वैयक्तिक कमेंट्स केल्या तर, हे खरंच अवघड होईल. हा बैल नक्कीच नांगरासकट सगळ्या गोष्टी चांगल्या करेल” असं वैभवने सांगितलं. तर, ट्रॉफी बारामतीत आली पाहिजे असं सांगत वैभवने सूरज जिंकावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi vaibhav chavan express his feelings and reaction on negative tags like arbaz 2 read sva 00