Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा आजपासून सुरू होणार आहे. घरात पहिल्याच दिवशी संग्राम चौगुले या वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. आता या नव्या सदस्याची एन्ट्री झाल्यावर घरातील समीकरण कसं बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, तत्पूर्वी आलेल्या एका नव्या प्रोमोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

घरात पहिल्या दिवसापासून निक्की विरुद्ध वर्षा उसगांवकर हा संघर्ष पाहायला मिळाला होता. निक्कीला तिच्या प्रत्येक भांडणात अरबाज पटेल साथ देत असतो. अगदी रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर सुद्धा अरबाजची याप्रकरणी कानउघडणी केली आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये वर्षा उसगांवकर निक्कीवरून अरबाजची फिरकी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi season 5 Abhijeet Kelkar share post on Sangram Chougule entry
“खोकल्यावर उपाय केलात पण…”, संग्राम चौगुलेच्या जबरदस्त खेळावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “ब्रिंग बॅक राखी”
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
Leeza Bindra slams nikki tamboli bigg boss marathi 5
“रितेश सरांनी त्या मुलीला…”, अरबाज पटेलची गर्लफ्रेंड निक्कीबद्दल स्पष्टच बोलली; म्हणाली, “मी तुला कधीच…”
big boss marathi these contestants nominated in this week
Bigg Boss Marathi : घरातील ६ सदस्य झाले नॉमिनेट! पण, नेटकऱ्यांकडून अंकिताचं कौतुक, काय आहे कारण?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
bigg boss marathi season 5 pranit hatte angry on nikki tamboli
“निक्कीने बिग बॉसला विकत घेतलं आहे…”, मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख काही बोलले नाही तर…”
bigg boss marathi aarya slaps nikki surekha kudachi reaction
“अरबाज बोंबलत सुटला थप्पड मारली…”, निक्कीला कानशि‍लात लगावल्याप्रकरणी सुरेखा कुडचींचा सवाल, म्हणाल्या…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “माझी लायकी काढली, मतिमंद, बालिश…”, जान्हवीशी कडाक्याचं भांडण का झालं? घन:श्याम म्हणाला, “तिला नेहमी…”

Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांनी घेतली अरबाजची फिरकी

अरबाज या प्रोमोमध्ये वर्षा उसगांवकरांच्या मागे-मागे जात “ताई मला चिप्स द्या ना …” अशी विनवणी करत असल्याचं पाहायला मिळतं. यावर वर्षा म्हणतात, “मला मस्का लाव… मी जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे असं म्हण.” अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे, “ताई तुम्ही जगातल्या सर्वात सुंदर स्त्री आहात” असं अरबाज म्हणतो.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकर आणि अरबाज पटेल ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )

“निक्की आणि माझ्या भांडणात तू नेहमी माझी बाजू घेणार असं म्हण” असं वर्षा उसगांवकर अरबाजला सांगतात. यावर अरबाज खूपच चतुराईने उत्तर देतो. तो म्हणतो, “मी नेहमी तुमची आणि तिची बाजू घेणार ताई”… यानंतर निक्की काहीशी लाजते, तर दुसरीकडे संपूर्ण घरात एकच हास्यकल्लोळ झाल्याचं या प्रोमोमध्ये ( Bigg Boss Marathi ) पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : दीपिका पादुकोण- रणवीर सिंगच्या लेकीसाठी नेटकऱ्यांनी सुचवली सुंदर नावं, तुम्हाला ‘या’ यादीतील कोणतं नाव आवडलं?

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. घरातलं खेळीमेळीचं वातावरण पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. “या घरात वर्षा ताई खूप हसवतात”, “वर्षा ताई जबरदस्त” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर ( Bigg Boss Marathi ) केल्या आहेत.