Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. या शोला प्रेक्षकांचा सुद्धा तुफान प्रतिसाद मिळत आहे. रितेश देशमुख यंदाच्या पर्वाचं होस्टिंग करत आहे. भाऊच्या धक्क्यावर या आठवड्यात पुन्हा एकदा रितेशने वैभव, जान्हवी, निक्की अन् अरबाजची शाळा घेतली. निक्कीने केलेल्या चुकीच्या वक्तव्यांबद्दल रितेशने तिची चांगलीच कानउघडणी केली. भाऊच्या धक्क्यावर सगळेच सदस्य शांतपणे बसून आपल्या चुका ऐकत असतात पण, या सगळ्यात यावेळी काहीशी धमाल देखील स्पर्धकांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात घरामध्ये ( Bigg Boss Marathi ) अनेकदा वादाचे प्रसंद उद्भवतात. गेल्या आठवड्यात जान्हवीने वर्षा यांचा अनेक गोष्टींवरून अपमान देखील केला होता. यानंतर रितेशने तिची चांगलीच कानउघडणी केली होती. भाऊच्या धक्क्यावर घेतलेल्या शाळेनंतर जान्हवी या आठवड्यात फारसं कोणाला वाईट बोलली नाही. तरीही घरात पडलेले दोन ग्रुप कायम आहेत आणि जान्हवी सध्या निक्कीबरोबर खेळत आहे. तर, वर्षा उसगांवकर अभिजीत, अंकिता, पॅडी यांच्या ग्रुपमध्ये असतात. घरात सतत भांडणाऱ्या या दोघी वीकेंडच्या वारला मात्र एकत्र थिरकल्या आहेत.

हेही वाचा : श्रद्धा कपूरच्या Stree 2 ने बॉक्स ऑफिस गाजवलं; तीन दिवसांत १०० कोटी पार! तर, अक्षय कुमारच्या सिनेमावर पुन्हा फ्लॉपची पाटी

डान्स पाहून रितेश देशमुखने वाजवल्या शिट्ट्या

‘वाजले की बारा’ ही ‘नटरंग’ चित्रपटातील सहाबहार लावणी प्रेक्षकांमध्ये आजही लोकप्रिय आहे. याच लावणी गाण्यावर वर्षा आणि जान्हवीने जबरदस्त डान्स केला आहे. या दोघी सतत एकमेकींशी भांडत असतात, त्यामुळे वीकेंडला या दोघींना एकत्र डान्स करताना पाहून रितेशने देखील वर्षा आणि जान्हवीचं कौतुक केलं आहे.

जान्हवी अन् वर्षा यांचा डान्स पाहून रितेश देशमुखने चक्क शिट्ट्या वाजवल्या. एवढंच नव्हे तर डान्स सादर केल्यावर रितेशने वर्षा यांना मुजरा देखील केला. “वर्षाताई आणि जान्हवीच्या डान्सला मिळाली रितेश भाऊंची वाहवा” असं कॅप्शन देत ‘कलर्स मराठी वाहिनी’ने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “एक स्त्री असून वर्षा यांच्या मातृत्त्वावर भाष्य…”, निक्कीवर रितेश देशमुख संतापला; म्हणाला, “सॉरी हृदयातून आलं पाहिजे”

Bigg Boss Marathi : रितेश देशमुख ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

नेटकऱ्यांनी वर्षा उसगांवकरांच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे. या वयात सुद्धा त्यांची एनर्जी पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. या व्हिडीओवर युजर्सनी लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi varsha usgaonker and jahnavi killekar dance on vajle ki bara song video viral sva 00