Bigg Boss Marathi Varsha Usgaonker Reaction After Elimination : ‘बिग बॉस मराठी’च्या शेवटच्या आठवड्यात तब्बल ६७ दिवसांनी वर्षा उसगांवकरांनी घराचा निरोप घेतला. नुकतंच घरात मिडवीक एव्हिक्शन पार पडलं. यावेळी घरात सगळ्या स्पर्धकांसाठी ‘बीबी हाऊस पार्टी’चं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, पार्टी सुरू असतानाच ‘बिग बॉस’ने या सगळ्या सदस्यांना मोठा धक्का दिला. मिडवीक एलिमिनेशन जाहीर करून ‘बिग बॉस’ने पाचव्या पर्वातील टॉप-६ स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी या सहा सदस्यांमध्ये महाअंतिम फेरीत ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरशीची लढत होणार आहे. मात्र, तत्पूर्वी वर्षा यांचं एलिमिनेशन झाल्यामुळे अभिनेत्रीचे चाहते काहीसे नाराज झाल्याचं वातावरण आहे. वर्षा यांना स्वत:लाही आज त्या एलिमिनेट होतील असं वाटलं नव्हतं. पण, दुसरीकडे बॉटम – २ मध्ये येऊन सुद्धा अंकिताने ऐनवेळी बाजी फिरवली आहे.

शेवटच्या आठवड्यात घराबाहेर आल्यावर वर्षा उसगांवकरांनी त्यांचा ‘बिग बॉस’मधील आतापर्यंतचा ६७ दिवसांचा प्रवास कसा होता? याची माहिती देणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ६७ दिवसांनी वर्षा उसगांवकर Eliminate! एक्झिट घेताना म्हणाल्या, “या घरात अपमान तोंडावर पचवायला…”

वर्षा यांची घराबाहेर आल्यावर पहिली पोस्ट

वर्षा उसगांवकर लिहितात, “प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे आणि मी #BiggBoss च्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखलं नाहीतर मी आपलं सामर्थ्य, धैर्य आणि संघर्ष यांचा अनुभव घेतला. या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला, नवीन मित्र बनवले आणि माझ्या सच्च्या व्यक्तिमत्त्वाला वाव दिला. माझा हा अनुभव दर्शवतो की, प्रत्येक प्रवास आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि आपल्याला अधिक बलवान बनवतो.”

“तुमची ताई, तुमची वर्षा, तुमची #WonderGirl या शोमधून तुमचा निरोप घेत आहे. पण, मनोरंजनाचा हा घेतलेला वसा कायम पुढे चालत राहील! माझ्या प्रिय प्रेक्षकांना… प्रेम आणि फक्त प्रेम..! तसेच ‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi), ‘एन्डमोलशाईन इंडिया’, ‘कलर्स मराठी’, ‘जिओ सिनेमा’ आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार” असं वर्षा उसगांवकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Bigg Boss Marathi Varsha Usgaonker Reaction After Elimination : वर्षा उसगांवकर घराबाहेर, जाणून घ्या…

हेही वाचा : अभिजीत सावंत ठरला ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा Finalist! ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेणारे टॉप-६ स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या…

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी म्हणजेच ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. आता या सहा जणांमध्ये कोणता सदस्य आपलं नाव पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.