Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता एक नवीन ड्रामा सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात सर्व सदस्यांवर मात करत वर्षा उसगांवकर यांनी कॅप्टन्सी जिंकली होती. घराच्या कॅप्टन झाल्यावर सध्या त्यांच्या हातात सगळे अधिकार आले आहेत. त्यामुळे अन्य सदस्यांना ड्युट्या वाटप करणं, घरात लक्ष देणं याकडे वर्षा यांना या आठवड्यात लक्ष द्यायचं आहे. परंतु, आठवडा सुरू होताच निक्कीने घरातील बरीच कामं करण्यास विरोध दर्शवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स मराठी’ वाहिनीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये निक्कीने घरातली कामं करण्यास विरोध दर्शवला असल्याचं पाहायला मिळत आहे. “मी कोणतीही ड्युटी करणार नाही” असं ती सर्वांना सांगते. यावर घराच्या नव्या कॅप्टन वर्षा उसगांवकर म्हणतात, “तू अशी मनमानी इथे करू शकत नाहीस”

घरात सुरू असलेला गोंधळ पाहून अभिजीत निक्कीला विचारतो, “असं वागून काय होणार आहे?” यावर निक्की म्हणते, “मी आता १० वेळा झोपते… १० वेळा कुकडू कूSSचा अलार्म वाजल्यावर तू माझ्याशी बोलायला ये.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : घरातील एकूण ७ सदस्य झाले नॉमिनेट! ‘त्या’ निर्णयामुळे नेटकरी वर्षा-अंकितावर नाराज, नेमकं काय घडलं?

Bigg Boss Marathi

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “तिचं व्यक्तिमत्व, वागणं मला आवडलं नाही…”, घराबाहेर आलेली इरिना निक्कीबद्दल काय म्हणाली?

‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात दिवसा झोपणं हा नियमभंग केल्याचा प्रकार आहे. याची शिक्षा घरातील सर्व सदस्यांना भोगावी लागते. त्यामुळे निक्कीला असं करू नकोस हे सांगण्याचा सगळेजण प्रयत्न करत असतात. मात्र, ती कोणाचंही ऐकत नाही. शेवटी आर्या वैतागून “आपण थंड-थंड पाणी टाकूया…” असं म्हणत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्याने थंड पाण्याचं नाव काढताच निक्की पटकन उठते आणि म्हणते, “जर हिने माझ्या अंगावर पाणी टाकलं ना तर, आईशप्पथ मी सांगते…” एकंदर निक्कीच्या मनमानी कारभाराला घरातले सगळेच वैतागल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : ‘कोंबडी पळाली…’, गाण्यावर जान्हवी-सूरजचा जबरदस्त डान्स! ‘झापुक झुपूक’ हुकस्टेप करत जिंकलं मन; पाहा व्हिडीओ

दरम्यान, Bigg Boss Marathi च्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी “हा शो दिवसेंदिवस निक्कीभोवती फिरतोय”, “आता हिची परत नाटकं सुरू झाली”, “निक्की कॅप्टन असली की, सर्वांनी ऐकायचं नाहीतर ही कोणाचंही ऐकणार नाही” अशा कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय या आठवड्यात निक्की नॉमिनेटेड सुद्धा आहे त्यामुळे प्रेक्षक तिला वाचवतात की घराबाहेरचा रस्ता दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi varsha usgaonker slams nikki for breaking house rule watch new promo sva 00