Bigg Boss Marathi Varsha Usgaonker Eliminate : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ( ३ ऑक्टोबर ) मिडवीक एव्हिक्शन पार पडलं. घरातून कोणता सदस्य निरोप घेणार याबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर नेटकऱ्यांचा अंदाज खरा ठरला असून ‘बिग बॉस’च्या घरात ‘वंडरगर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा उसगांवकरांनी प्रेक्षकांकडून मिळालेल्या कमी मतांमुळे या घराचा निरोप घेतला आहे.

यंदा ‘बिग बॉस’चं पर्व हे शंभर दिवसांऐवजी केवळ ७० दिवसांचं असणार आहे. त्यामुळे महाअंतिम सोहळ्याला अवघे तीन दिवस बाकी राहिलेले असताना म्हणजे ६७ दिवसांनी वर्षा उसगांवकर घरातून एलिमिनेट झाल्या आहेत. हे एलिमिनेशन प्रत्येकासाठी धक्कादायक होतं. ‘बिग बॉस’च्या घरात सध्या वर्षा यांच्या सर्वात जवळ असलेली जान्हवी यावेळी प्रचंड भावुक झाली होती.

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
Bigg Boss 18 Farah Khan warns to rajat dalal on weekend ka vaar
Bigg Boss 18: “…तर तू थेट शो बाहेर होशील”, फराह खानने रजत दलालला चांगलंच झापलं अन् दिली शेवटची ताकीद, म्हणाली, “तू स्वतःला…”
expert career advice tips in marathi
करिअर मंत्र

अंकिता आणि वर्षा उसगांवकर या दोघीही बॉटम-२ मध्ये होत्या. मात्र, शेवटी अंकिताने टॉप-६ फायनलिस्टमध्ये स्थान मिळवलं आणि वर्षा यांनी या घराचा निरोप घेतला. अभिनेत्री एक्झिट घेताना काय म्हणाल्या जाणून घेऊयात…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : अभिजीत सावंत ठरला ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा Finalist! ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेणारा तिसरा स्पर्धक कोण? जाणून घ्या…

वर्षा उसगांवकर घरातून एक्झिट घेताना काय म्हणाल्या?

वर्षा उसगांवकर सर्व प्रेक्षकांना व घरातील सदस्यांना उद्देशून त्यांच्या प्रवासाबद्दल म्हणाल्या, “मी इथे काय नाही शिकले…सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे कोथिंबीर निवडायला शिकले, जे मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपमान तोंडावर पचवायला शिकले. पण, काही हरकत नाही. कारण, सगळी स्वप्न सत्यात उतरायला पाहिजे असं काही नसतं. ‘बिग बॉस’ आणि जनतेच्या इच्छेपुढे कोणीही नाही. धन्यवाद महाराष्ट्र!”

अभिनेत्रीने त्यांचं मनोगत व्यक्त केल्यावर ‘बिग बॉस’ त्यांच्या खेळाचं कौतुक करत म्हणाले, “वर्षा आपण घरात दाखवलेला उत्साह, आपला वावर खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. आज आपण घराबाहेर जात असलात तरी, मी खात्रीने सांगू शकतो की, या वंडरवुमनचा बिग बॉसच्या घरातील प्रवास कोणीच विसरू शकणार नाही.”

हेही वाचा : Bigg Boss च्या पार्टीत सूरजचा जबरदस्त डान्स! ‘झापुक झूपक’ हुकस्टेप करत वेधलं सर्वांचं लक्ष; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

Bigg Boss Marathi Varsha Usgaonker
Bigg Boss Marathi Varsha Usgaonker : वर्षा उसगांवकर

दरम्यान, वर्षा यांनी घराचा निरोप घेतल्यामुळे आता ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या पर्वाचे सहा फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी या सहांमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी अंतिम लढत होणार आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे.

Story img Loader