Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवसापासून हा शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. एवढंच नव्हे तर मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार सुद्धा या कार्यक्रमात घडणाऱ्या विविध प्रसंगांवर व्यक्त होत असतात. काही दिवसांपूर्वी जान्हवी किल्लेकरने घरात पॅडी कांबळेचा अभिनयावरून अपमान केला होता. यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील बहुतांश कलाकारांनी जान्हवीला खडेबोल सुनावले होते. यानंतर घरात तिने पॅडीची माफी देखील मागितली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार अलीकडे नेहमीच ‘बिग बॉस मराठी’बद्दल पोस्ट शेअर करत फेसबुकवर व्यक्त होत असते. पंढरीनाथ कांबळे तिचा जवळचा मित्र असल्याने अभिनेत्री टीम ‘बी’ला सपोर्ट करते. नुकताच झालेला भाऊचा धक्का आणि निक्कीचा अनसीन अनदेखामधील एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री तिचं मत मांडत निक्कीवर संताप व्यक्त आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “निक्की पुराण ऐकायला दीड तास वाया…”, भाऊचा धक्का पाहून नेटकरी नाराज! म्हणाले, “रितेश भाऊ…”

विशाखा सुभेदारची पोस्ट

काल निक्की सोडून सगळेच चुकले… जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसले.. अरबाजने प्यादं केलं उरलेल्या लोकांचं.
मान्य चुकलंच! त्यांच्यावर आधारित असा (अरबाज + निक्की) तुमचा Game नकोच असायला.. अरबाज आणि निक्की त्यांची खेळी खेळत आहेत तुम्ही तुमचं खेळा..!

आता धक्का… B team लाच.. आणि आम्हा प्रेक्षकांना सुद्धा

निक्कीने डबा फोडला… तिच्या ट्रॉमामुळे ती अंधारात गेली नाही, हा तिचा Game होता. मग, अभिजितला त्याक्षणी team b ने सपोर्ट न करणं हा त्यांचा game असू शकत नाही? जेणेकरून निक्कीला आत जावच लागेल… Individual game आणि team स्पिरिटचा game आहे. घेतला एकत्र डिसिजन… मग त्यांना मैत्रीचे का ढाचे आणि नियम असूनही ती सपोर्ट करीत नाही तिला काहीच बोललं गेलं नाही का? आणि ऑप्शन का दिला गेला? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचा? फक्त b team ला का धारेवर धरलं जातं??

आता जरा निक्की बद्दल…
या बाई… निक्कीची चिक्की म्हणजे वाइल्ड कार्ड एन्ट्री.
आणि हा ( मी जो post करतेय तो )video पाहिला मी आणि असं वाटलं की ही घरून ठरवूनच आलीय, एक handsome सदस्य बिग बॉसने घरात तिच्यासाठी आणायचा (माझ्यासाठीच फक्त इति निक्की ) आणि ती प्रेमाचे रंग उधळणार आणि त्याच्या बळाचा ही फायदा घेणार… आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार!

अरे हे काय आहे??? किती स्वार्थी असावं..? अप्पलपोटी, ढालगज आणि तिचं हे ज्ञान अभिजित निमूटपणे कसं ऐकून घेतो… ही निक्कीची सो called स्ट्रेटेजी..?? या आधी हे एकमेकांमध्ये गुंतणं आम्ही पाहिलंय..(पण ते ठरवून नाही वाटलं नंतर नंतर ते कळलंच) पण हे अग्रेशन खरं खोटं देवास ठाऊक आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन ह्या season मध्येच ऐकला, पाहिला.
अरबाज वैभव भिडले नाहीत.. तशा निक्की आणि जान्हवी पण भिडल्या नाहीत.. ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं.. कारण ती तिच्यासमोर उतरत नाही तिला उलट बोलत नाही आणि वैभव पण घाबरतो अरबाजला…!

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : बाईSSS हा काय प्रकार! मराठी अभिनेत्रींमध्ये ‘बिग बॉस’ची क्रेझ; चक्क हॉटेलमध्ये पाहिला भाऊचा धक्का, म्हणाल्या…

Bigg Boss Marathi : विशाखा सुभेदारची पोस्ट

दरम्यान, विशाखा सुभेदारने शेअर केलेल्या नेटकऱ्यांनी देखील सहमती दर्शवली आहे. यापूर्वी विशाखाने जान्हवीने ( Bigg Boss Marathi ) पॅडीसंदर्भात केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल देखील नाराजी व्यक्त करत पोस्ट शेअर केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi vishakha subhedar shared angry post about nikki game strategy sva 00