Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ टास्कदरम्यान जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथ कांबळेच्या करिअरवर भाष्य करत त्याचा अपमान केल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर अभिनेत्रीविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. अशातच आता जान्हवीला केलेल्या चुकीची उपरती झाली आहे. घरात ढसाढसा रडून, हात जोडून तिने पंढरीनाथ कांबळेची माफी मागितली. मात्र, वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केल्यावर आता माफी मागणं म्हणजे केवळ नाटक असल्याचं काही मराठी कलाकारांनी म्हटलं आहे.
विशाखा सुभेदारने काल पॅडीला पाठिंबा देत पोस्ट शेअर केली होती. आज पुन्हा जान्हवीने माफी मागितल्यावर अभिनेत्रीने फेसबुक पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : जान्हवीने ढसाढसा रडत मागितली माफी! पंढरीनाथ कांबळेसमोर हात जोडून म्हणाली, “मी गेम खेळताना अती…”
विशाखा सुभेदाराची फेसबुक पोस्ट
माफ केलं तुला असं नाही म्हणालाय तो…पण, मनाचा मोठेपणा मात्र दाखवलायं. Its Ok. म्हणजे ठीक आहे असं म्हणालाय… Actor आहे तो, आम्ही रोज हे भाव भावनांचं विश्व घेऊन हिंडतो. पाठमोरा माणूस सुद्धा काय म्हणतं असेल हे कळू शकतं आम्हाला, कारण तोच तर आमचा धंदा आहे…! त्या अनुभवी माणसाला अश्रू खरे- खोटे कळले नसतील? तरीही तुझ्या खोट्या अश्रूंना तो Its Ok म्हणाला.. कारण, तो खरंच बापमाणूस आहे…!
त्याने दिला असेल विषय सोडून पण बाई आता तरी जिभेला आवर घाल. More power to Paddy Kamble.
लढ बापू #aplapaddy #संयमकायम #actorकाल काय झालं…बाहेरच्या जगात सुद्धा मी तुझं रक्षण करेन… असं रक्षाबंधन साजरं झालं.. शॉपिंग झाली, माफी मागणं ही नौटंकी झाली, कॅप्टन बदलला आणि तेच जास्त बोलले… Mike वरून.
हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही”, जान्हवीकडून पंढरीनाथचा अपमान; आर्याने जाब विचारताच म्हणाली, “जा फूट…”
हेही वाचा : बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
दरम्यान, जान्हवीने माफी मागितल्यावर पंढरीनाथने देखील तिला मोठ्या मनाने माफ करत यापुढे असं वैयक्तिक भाष्य करू नकोस असा सल्ला दिला आहे. आता यापुढे जान्हवी घरात कशी वागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd