Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये दोन्ही गटांमध्ये जोरदार भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी जान्हवी किल्लेकरने पुन्हा एकदा घरातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे.

जान्हवीने पंढरीनाथ यांच्या करिअरवर बोट ठेवत त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकि‍र्दीवर टीका केली. यासंदर्भात आता मराठी कलाविश्वात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. जान्हवी ( Bigg Boss Marathi ) विरोधात नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून काही मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत याप्रकरणावर भाष्य केलं आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”

हेही वाचा : Video : अखेर तो क्षण आला! मायलेकाची भेट होणार, अधिपती – चारुलता आले समोरासमोर, मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष

विशाखा सुभेदार यांची पोस्ट ( Bigg Boss Marathi )

कहेता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना…
पॅडी More Power To You.
विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक…
निक्की बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना “जोकर” म्हणालात…! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर.
हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिंमत लागते, ती तुमच्याकडे नाही. गेली अनेकं वर्ष हे कामं तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि अगं ए मुली… तुझा जन्म कदाचित २००० तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली १९९८ मध्ये.
त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला.. ‘येड्यांची जत्रा’मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत.
जान्हवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाहीयेत.. गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते..! आणि त्यांच्या विनोदाचा टायमिंग याबद्दल तर तू बोलायचंस नाही. नखाची किंमत नाहीये तुला आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केलाय आतापर्यंत.. Game आहे Game आहे असं म्हणतं मी दोन तीन एपिसोड पाहिले पण, तुम्ही तर थांबतच नाही आहात.

ताईंनी Glamour मिळवून दिलं मराठी सिनेमाला… त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई… त्यांच्या दमावर आणि त्याकाळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळे, नाटक सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखणं बंद करा…जरा बोलताना भान ठेवा.
विनोदामुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, ५० शी पूर्ण झालीये त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो… शांत आहे याचा अर्थ असं नाहीये की त्याला सेल्फ Respect नाहीये..!

आता थोडं पॅडीबद्दल…
पॅडी माऊली… तुझा खेळ तू खूप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा…! आता तर तू जोरात आला आहेस..!
इतकं हिडीस बोलल्यानंतरही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयेत त्याबद्दल तुला सलाम… खचून जाऊ नकोस…! टास्कमध्ये जोर लावून खेळ मित्रा..!
तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलस आज.
एक उत्तम Reactor असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक…!
बाकी तुझ्या फळांनी मजा आणली. काय Timing भन्नाट.
निक्कीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत… खरंतर जां रोज जां… आणि तिचे वाळत घातलेले पापड असतील नां त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडाचा…!
करिअरवर बोलायचं नाही…!

हेही वाचा : Bigg Boss Marathi – “ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले…”, जान्हवीने पुन्हा ओलांडली पातळी! करिअरवर बोट ठेवत पॅडीचा अभिनयावरून केला अपमान

दरम्यान, विशाखा सुभेदार यांच्या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. नेटकऱ्यांनी देखील कमेंट्समध्ये निक्की-जान्हवीच्या ( Bigg Boss Marathi ) वागणुरकीबद्दल संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader