Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कमध्ये दोन्ही गटांमध्ये जोरदार भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी जान्हवी किल्लेकरने पुन्हा एकदा घरातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे.
जान्हवीने पंढरीनाथ यांच्या करिअरवर बोट ठेवत त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीवर टीका केली. यासंदर्भात आता मराठी कलाविश्वात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. जान्हवी ( Bigg Boss Marathi ) विरोधात नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून काही मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत याप्रकरणावर भाष्य केलं आहे.
विशाखा सुभेदार यांची पोस्ट ( Bigg Boss Marathi )
कहेता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना…
पॅडी More Power To You.
विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक…
निक्की बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना “जोकर” म्हणालात…! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर.
हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही. त्यासाठी हिंमत लागते, ती तुमच्याकडे नाही. गेली अनेकं वर्ष हे कामं तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि अगं ए मुली… तुझा जन्म कदाचित २००० तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली १९९८ मध्ये.
त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला.. ‘येड्यांची जत्रा’मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत.
जान्हवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाहीयेत.. गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते..! आणि त्यांच्या विनोदाचा टायमिंग याबद्दल तर तू बोलायचंस नाही. नखाची किंमत नाहीये तुला आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केलाय आतापर्यंत.. Game आहे Game आहे असं म्हणतं मी दोन तीन एपिसोड पाहिले पण, तुम्ही तर थांबतच नाही आहात.ताईंनी Glamour मिळवून दिलं मराठी सिनेमाला… त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई… त्यांच्या दमावर आणि त्याकाळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळे, नाटक सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखणं बंद करा…जरा बोलताना भान ठेवा.
विनोदामुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, ५० शी पूर्ण झालीये त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो… शांत आहे याचा अर्थ असं नाहीये की त्याला सेल्फ Respect नाहीये..!आता थोडं पॅडीबद्दल…
पॅडी माऊली… तुझा खेळ तू खूप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा…! आता तर तू जोरात आला आहेस..!
इतकं हिडीस बोलल्यानंतरही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयेत त्याबद्दल तुला सलाम… खचून जाऊ नकोस…! टास्कमध्ये जोर लावून खेळ मित्रा..!
तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलस आज.
एक उत्तम Reactor असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक…!
बाकी तुझ्या फळांनी मजा आणली. काय Timing भन्नाट.
निक्कीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत… खरंतर जां रोज जां… आणि तिचे वाळत घातलेले पापड असतील नां त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडाचा…!
करिअरवर बोलायचं नाही…!
दरम्यान, विशाखा सुभेदार यांच्या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स करत त्यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. नेटकऱ्यांनी देखील कमेंट्समध्ये निक्की-जान्हवीच्या ( Bigg Boss Marathi ) वागणुरकीबद्दल संताप व्यक्त केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd