Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला बाहुल्यांरुपी दोन बाळांचं आगमन झालं होतं. या टास्कमध्ये निक्कीच्या टीमने बाजी मारली. मात्र, या टास्कदरम्यान घरातील सदस्यांमध्ये बरेच वादविवाद झाले. अनेक स्पर्धकांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन कमेंट्स केल्या. याबद्दल सर्वत्र नाराजी पसरली आहे. अशा परिस्थिती सुद्धा ‘बिग बॉस’च्या घरातील काही खेळाडू कोणताही वाद न घालता खूप सुंदर पद्धतीने आपला खेळ खेळत होते.
रितेश देशमुख यांनी आतापर्यंत झालेल्या भाऊच्या धक्क्यावर पंढरीनाथ यांना आणखी मोकळेपणाने खेळा, तुमचं मत मांडा असा सल्ला दिला होता. यानुसार आता पंढरीनाथ यांनी त्यांच्या गेममध्ये बरीच सुधारणा केल्याचं पाहायला मिळत आहे. पंढरीनाथ यांना कलाविश्वात सगळेच पॅडी म्हणून ओळखतात. त्यामुळे विशाखा सुभेदार यांनी पॅडीसाठी खास पोस्ट शेअर करत, आपल्या मित्राला फुल्ल सपोर्ट दर्शवला आहे.
Bigg Boss Marathi : विशाखा सुभेदार यांची पोस्ट
तुझ्यातला माणूस… त्याला दिसला असावा… म्हणूनच मैत्रीचं पाऊल त्याने उचललं… फुल्ल सपोर्ट तुला, आता एकदा आपलं गाणं होऊन जाऊ दे.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा…!१)अरे बाबा भांडणात सुद्धा तू एकदाही चुकीचा नव्हतास… तुझे मुद्दे फंडे Clear होते… एक अख्खा दिवस तू तुझा खेळत होतास. कुठेही चुकीचं पाऊल, वक्तव्य नाही, कोणालाही लागेल असं स्टेटमेंट नाही.
२) त्या पुढारीला तू कोण? असं त्याला विचारलंस तेव्हाचं टायमिंग इतकं कमाल होतं… की मरणाची हसले मी.
३) निक्कीला नडणं हे Perfect होतं कारण ही रास्त. तिच्यावर आवाज… मजा आली. तू तुझं काम करत नव्हतीस आणि घूस त्या ड्रॉवरमध्ये सूर मार Was एपिक.
४) काल वर्षा ताईंची नाजूक मुद्द्यावर बाजू घेतली. ताईंनी तुझा खांदा थोपटला… #PaddyKambleGoodHuman.
५) डीपीची साथ सुद्धा मजा, मस्करी, पिकनिक Spot वर तू धमाल करीत असणार जे एक तासाच्या एपिसोड मध्ये पहायला मिळत नाही… पिकनिक बास्केट सुद्धा गाजव हक्काने.
६) दोन आठवडे थंड होतास, उमजत नव्हतं कोण कायं कसं याचा अंदाज घेत होतास..! प्रेक्षक आणि पिकनिकचे अध्यक्ष म्हटलं रितेशभाऊ पण, आता नाही बोलणार.. आता तर तू स्वार झाला आहेस.. मांड आता तर ठोकली आहेस…सुरु झालाय game तुझा.
7) जरी तू शांत तरी नसे तू थंड… आग हैं… आम्हाला माहीत आहे जिगरा हैं..!
हेही वाचा : Bigg Boss Marathi : “जान्हवी खूप भोळी आहे”, ‘बिग बॉस’मधील मैत्रिणीबद्दल मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला, “ती मॉडर्न दिसते पण…”
दरम्यान, सध्या ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात कॅफ्टनसी कार्य चालू आहे. यामध्ये संपूर्ण घर दोन ग्रुप्समध्ये विभागलं आहे. यामधल्या पहिल्या फेरीत निक्कीच्या टीमने बाजी मारली आहे. आता उर्वरित फेऱ्या उद्याच्या भागात पाहायला मिळतील. आता या फेऱ्यांमध्ये बाजी मारत कोणता सदस्य कॅप्टन होणार याचा उलगडा लवकरच होईल.