Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan And Kedar Shinde : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने नुकताच त्याचा ३० वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त तो ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदेंच्या घरी गेला होता. पहिल्या दिवसापासून सूरजला ‘बिग बॉस’च्या संपूर्ण टीमने मोठा पाठिंबा दिला. त्यामुळे वाढदिवसानिमित्त सूरज केदार शिंदेंना भेटण्यासाठी खास त्यांच्या घरी पोहोचला होता. याचा व्हिडीओ या ‘गुलीगत किंग’ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरजला ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता घोषित केल्यावर केदार शिंदे यांनी रंगमंचावरच त्याच्यासाठी आणखी एक घोषणा केली होती. ती म्हणजे, लवकरच ते सूरज चव्हाणला घेऊन ‘झापुक झुपूक’ हा सिनेमा बनवणार आहेत. या सिनेमात सूरज मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असतानाच सूरज वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी दिग्दर्शकाच्या घरी गेला होता.

हेही वाचा : Video: ‘मानवत मर्डर्स माझी पहिली केस’, शरद पवारांनी उलगडला १९७२ चा थरारक खटला; रमाकांत कुलकर्णींबद्दल म्हणाले…

केदार शिंदेंनी वाढदिवसानिमित्त सूरजला दिली खास भेटवस्तू

सूरज चव्हाणने ( Bigg Boss Marathi ) सर्वात आधी केदार शिंदेंना घट्ट मिठी मारली, त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर दिग्दर्शकांनी त्याला वाढदिवसानिमित्त खास भेटवस्तू दिली. या सगळ्या गिफ्ट्समध्ये एक खास गोष्ट होती ती म्हणजे देवाच्या पादुका…या पादुका पाहून सूरज भारावून गेला. त्याने केदार शिंदे यांचे आभार मानले. हा सुंदर क्षण व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करत सूरजने याला “भेटला विठ्ठल माझा…” हे गाणं जोडलं आहे.

हेही वाचा : Video: सिद्धार्थ जाधव लवकरच येतोय धिंगाणा घालायला; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व कधीपासून सुरू होणार जाणून घ्या…

सूरज चव्हाण व केदार शिंदे ( Bigg Boss Marathi – Suraj Chavan And Kedar Shinde )

सूरज आणि केदार शिंदेंची ही भेट सर्व चाहत्यांना याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांना सुखावणारी ठरली आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सूरजने ‘हॉर्ट’ इमोजी दिला आहे. नेटकऱ्यांसह सूरजचे चाहते या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

हेही वाचा : Video : “दाजींना सांग चांगली गाणी…”, अंकिता अन् सूरजचं फोनवर भन्नाट संभाषण; ‘कोकण हार्टेड बॉय’ला दिला खास निरोप

दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सूरजने ( Bigg Boss Marathi ) केदार शिंदे यांचा उल्लेख ‘ते माझे देव आहेत’ असा केला होता. त्यामुळे या गुरू-शिष्याचं असलेलं हे गोड नातं पाहून सध्या नेटकरी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi winner suraj chavan meets kedar shinde on the occasion of birthday watch video sva 00