Suraj Chavan Gautami Patil Video: बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व जिंकणाऱ्या सूरज चव्हाणचीच सगळीकडे चर्चा आहे. शो जिंकल्यानंतर सूरजची अनेकजण भेट घेत आहेत. तो विविध ठिकाणांना भेटी देतोय. बारामतीजवळच्या मोढवे गावातील गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज आता प्रचंड लोकप्रिय झाला आहे. हा शो जिंकल्यानंतर सूरजचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्कार केला होता. तो व्हिडीओ चांगलाच चर्चेत होता.
आता सूरज चव्हाणची भेट डान्सर गौतमी पाटीलने घेतली आहे. गौतमीने सूरजबरोबरच्या भेटीचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत ते दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा – Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”
‘सूरज भाऊने मार्केट जाम केलंय’, ‘सूरज सध्या टॉपला आहे’, ‘झापूक झुपूक’, ‘गौतमी आणि सूरज यांनी एक असं उदाहरण घालून दिलं आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्य करा फक्त आपल्याकडून १००% दिले पाहिजे मग त्याचं फळ ईश्वर देईल,’ ‘सूरजचा साधेपणा पाहा’, अशा कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
सूरज चव्हाणचा संघर्ष
दरम्यान, सूरज चव्हाणबद्दल बोलायचं झाल्यास तो मोढवे गावात अतिशय गरीब कुटुंबात जन्मला. सूरजला पाच बहिणी आहेत. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले. या धक्क्याने त्याची आई खचली आणि तिला वेड लागलं. काही काळाने तिनेही या जगाचा निरोप घेतला. सूरजचा सांभाळ त्याच्या बहिणींनी केला. मरी मातेच्या मंदिरात नैवेद्यासाठी येणारे नारळ खाऊन तो पोट भरायचा.
सूरज चव्हाणने मोलमजुरी करूनही दिवस काढले आहेत. तो रानात काम करायला जायचा, मजुरी करून मिळणाऱ्या पैशांतून दिवस काढायचा. याच सूरजला टिकटॉक व इन्स्टाग्राम व्हिडीओमुळे प्रसिद्धी मिळाली आणि नंतर त्याला बिग बॉस मराठीची संधी मिळाली. त्याला वाटलं की आपली फसवणूक होतेय म्हणून त्याने बिग बॉसमध्ये येण्यास नकार दिला होता मात्र टीमने त्याला समजावलं नंतर तो या शोमध्ये झाला आणि ७० दिवसांच्या प्रवासानंतर तो विजेता ठरला.