Suraj Chavan Kajal Shinde Video: बारामतीजवळच्या मोढवे गावातील रीलस्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg Boss Marathi 5) पर्वाचा विजेता ठरला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करून बिग बॉसचं विजेतेपद पटकावणारा सूरज चव्हाण ट्रॉफी घेऊन आता गावी पोहोचला आहे. गावी गेल्यावर त्याची भेट त्याच्या मैत्रिणीशी झाली. दोघांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांना लगन करण्याचा सल्ला देत आहेत.

सूरज चव्हाणच्या या मैत्रिणीचं नाव काजल शिंदे आहे. व्हिडीओत काजल सूरजला विचारते, ‘विसरलाय होय मला’. त्यावर सूरज नकार देतो. ‘तू माझी हिरोईन आहेस’, असं तो काजलला म्हणतो. त्यावर काजल म्हणाली, मला वाटलं की तू मला विसरलास, तितक्यात निक्की त्याची बहीण आहे असं कोणतरी बोलतं. त्यानंतर काजल सूरजचं अभिनंदन करते आणि असाच आयुष्यात पुढे जा म्हणते.

lawrence bishnoi brother anmol bishoi
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला; अनमोल बिश्नोई कोण?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
The sister cried out for her brother Video Viral
‘दादा तू परत ये ना..’ पाण्यात उडी मारणाऱ्या भावासाठी बहिणीने केला आक्रोश; हृदयस्पर्शी Video Viral
Heart touching Advertise banner against son from father life lessons for son photo viral on social media
Photo: “कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये” वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावी अशी जाहिरात; नक्की वाचा
Suraj chavan wedding plans
सूरज चव्हाणला करायचंय लग्न, कशी मुलगी हवी? अपेक्षा सांगत म्हणाला, “साडी नेसणारी हवी, कारण…”
Suraj Chavan Said This Thing About His X Girl Friend
Suraj Chavan : ‘एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?’, सूरज चव्हाण म्हणाला, “बच्चाला आता…”
Maharashtra traditional jewellery
कोल्हापूरी साज ते बकुळीहार; तुमच्याकडे यापैकी कोणते महाराष्ट्रीयन पारंपारिक दागिने आहेत?
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…

सूरज चव्हाण विजेता होण्यास पात्र होता का? निक्की तांबोळी म्हणाली, “पहिल्या दिवसापासून पाहायचं झाल्यास..”

सूरज-काजलच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

‘अजूनही सूरजच्या पायात चप्पल नाहीये … कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवरच आहेत अजून म्हणून सूरज महाराष्ट्राची पहिली पसंत आहे,’ ‘सूरज हीच ती आमची वहिनी शोभेल, तुला खरंच जिवापाड जपेल,’ ‘सूरज वेळ लावू नको करून टाक लग्न,’ ‘खरं तर सुरजला आता जो सिनेमा मिळालाय…. त्यात काजल हिरोईन पाहिजे….दोन्हीपण कॅरॅक्टर जबरदस्त आहेत,’ ‘काजल सूरजबरोबर लग्न कर त्याला तुझा आधार चांगला मिळेल,’ ‘तू अजून पुढे जा आणि जाताना तिला पण घेऊन जा,’ ‘सूरज हीच बायको म्हणून शोभेल तुला आणि सांभाळेल,’ अशा कमेंट्स यावर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

suraj chavan kajal shinde 1
सूरज व काजलच्या व्हिडीओवरील कमेंट्स
suraj chavan kajal shinde 2
सूरज व काजलच्या व्हिडीओवरील कमेंट्स

कोण आहे काजल शिंदे?

Who is Kajal Shinde: सूरजबरोबर व्हिडीओ शेअर करणारी काजल शिंदे ही कंटेंट क्रिएटर आहे. सूरज आणि काजलने यापूर्वी अनेक व्हिडीओ एकत्र शूट केले आहे. काजल व सूरज यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

सूरज चव्हाणचा बिग बॉसमधील प्रवास

सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीमध्ये यायचं नव्हतं. त्याला वाटत होतं की त्याची फसवणूक केली जात आहे. मात्र चॅनलच्या लोकांनी त्याला विश्वासात घेतलं आणि शेवटी त्याने होकार दिला. त्यानंतर बिग बॉस मराठीच्या ७० दिवसांच्या प्रवासात सूरजने आपल्या साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि नंतर तो बिग बॉसच्या ट्रॉफीचा विजेता ठरला. सूरजने शो जिंकल्यावर त्याला १४.६ लाख रुपये आणि इतर भेटवस्तू मिळाल्या. तसेच त्याची भविष्यात कुणीही आर्थिक फसवणूक करू नये त्यासाठी होस्ट रितेश देशमुखने त्याच्यासाठी मॅनेजरची व्यवस्था केली आहे.

रितेश भाऊंचा फुल्ल सपोर्ट! सूरज चव्हाणची भविष्यात आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय; दिली ‘ही’ खास भेट

सूरज चव्हाणचा चित्रपट

सूरज चव्हाण लवकरच ‘राजाराणी’ चित्रपटात दिसणार आहे. भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गालगुंडे यांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. तसेच केदार शिंदे यांनी सूरजवर ‘झापूक झुपूक’ नावाचा सिनेमा काढण्याची घोषणा केली आहे.

Story img Loader