Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे सूरज चव्हाणचं नाव घराघरांत लोकप्रिय झालं. ‘झापुक झुपूक’ अंदाजात या ‘गुलीगत किंग’ने Bigg Boss च्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. शो सुरू असताना ७० दिवसांमध्ये घराघरांत सूरजचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला होता. शो सुरू असताना सूरजने एक स्वप्न पाहिलं होतं… ते म्हणजे आपल्या हक्काच्या घराचं! ‘गुलीगत किंग’चं हेच स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे.

सूरज चव्हाणच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. बालपणी आई-बाबांचं छत्र हरपल्यामुळे त्याच्या बहि‍णींनी त्याचा सांभाळ केला. यानंतर सोशल मीडिया रील्समुळे सूरज घराघरांत लोकप्रिय झाला. पण, त्याचं खरं नशीब ‘बिग बॉस’मुळे बदललं. यामुळेच, शो संपताना सूरजने आता गावी जाऊन सर्वात आधी आपलं हक्काचं घर बांधणार आणि त्याला Bigg Boss चं नाव देणार असा निश्चय केला होता.

Mika Singh angry because Anant Ambani did not gift him 2 crore
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
navri mile hitlerla fame actresses energetic dance
Video : अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय…! ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
Rang Maza Vegla Fame Actress sonali salunkhe wedding
रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ! धुळ्यात थाटात पार पडला विवाहसोहळा, फोटो पाहिलेत का?
School teacher dance on marathi song Madanmanjiri in school ground video goes viral
शिक्षिकेचा नादच खुळा! “अशी मी मदन मंजिरी..” गाण्यावर केला तुफान डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन
Shruti Haasan
कमल हासन व सारिका यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाली श्रुती हासन; म्हणाली, “आई या लग्नातून बाहेर पडली त्यावेळी…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा : Video : अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय…! ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्रींचा जबरदस्त डान्स; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

बारामतीच्या सुपुत्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला लवकरात लवकर हक्काचं घर बांधून देण्यात येईल असा शब्द दिला होता. आता त्या घराचं बांधकाम सुरू झालेलं आहे. अजित पवारांनी घोषणा केल्यावर सूरजच्या नव्या घराचा भूमिपूजन सोहळा लगेच पार पडला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सूरजने “घराचं स्वप्न पूर्ण होतंय याचा प्रचंड आनंद झालाय. मला खूप बरं वाटतंय. दादांनी ( अजित पवार ) माझं हे घराचं स्वप्न पूर्ण केलं. गरीबाच्या पोराला मदत केली यासाठी त्यांचा मी खूप आभारी आहे.” असं म्हटलं होतं. आता सूरजने याची खास झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

हेही वाचा : अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”

सूरजने नव्या घराच्या व्हिडीओला “माझं घर… लवकरच Bigg Boss चा बंगला” तयार होणार असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “स्वप्नपूर्ती”, “सूरजचे कष्ट फळाला आले”, “ज्याला कष्टाची लाज नाही, ती व्यक्ती आयुष्यात कधीच उपाशी राहत नाही”, “नेहमी आनंदी राहा भावा”, “हे दिवस बघायला सूरजचे आई-वडील असायला पाहिजे होते”, “कष्टाचं चीज झालं” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी यावर केल्या आहेत.

Story img Loader