Suraj Chavan : बिग बॉसच्या पाचव्या पर्वातून सूरज चव्हाणने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. या पर्वाचा तो विजेता ठरला आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर घराघरात त्याचं कौतुक करण्यात आलं. प्रत्येक सामान्य व्यक्तीला सूरजचा विजय म्हणजे आपला स्वत:चा विजय झाल्यासारखं वाटलं. सूरज चव्हाणनं बिग बॉसमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर अनेक कलाकारांनी त्याची भेट घेतली. गावात मोठी मिरवणूक काढण्याबरोबर विविध ठिकाणी त्याचा सत्कार समारंभ पार पडला. आता सूरज थेट एका जिल्हा परिषद शाळेत पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सूरज चव्हाणचा चाहता वर्ग म्हणजे फक्त तरुणाई नाही, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींनादेखील त्याच्या कामाची भुरळ पडली आहे. त्याच्या अतरंगी व्हिडीओने अनेक जण खळखळून हसतात. सूरज चव्हाणने नुकतीच पुण्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वसेवाडी (सणसवाडी)’ येथे भेट दिली आहे. शाळेत सूरज येणार हे विद्यार्थ्यांना माहीत असल्याने, सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानात जमा झाले होते. सूरजची एन्ट्री होताच विद्यार्थ्यांना फार आनंद झाला.

हेही वाचा : सचिन पिळगांवकर पत्नी सुप्रिया यांच्यासह करतायत भूतानची सफर; शेअर केले नयनरम्य फोटो

प्राथमिक शाळेतील या विद्यार्थ्यांनी सूरज, सूरज… असं ओरडत एकच कल्ला केला. सूरजला पाहून विद्यार्थ्यांना फार आनंद झाला. टाळ्यांच्या गजरात सर्व विद्यार्थ्यांनी सूरजचं स्वागत केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर लाइक्सचा पाऊस पाडलाय.

एका चाहत्याने कमेंटमध्ये म्हटलं, “याला म्हणतात… खरी माणसाची जगाला ओळख… शाळेत न जाणारा मुलगा आज शाळेत आमंत्रण घेऊन प्रमुख पाहुणा म्हणून आला. खऱ्या माणसाला या जगाची ओळख व्हायला थोडा वेळच लागतो… जिंकलंस सूरज.” तर आणखी एका युजरनं लिहिलंय, “लहान मुलांचा आनंद सांगून जातो की, तू काय कमवलं आहेस तुझ्या आयुष्यात…” पुढे सूरजच्या मनाच्या श्रीमंतीवर एकानं कमेंट करत, “माणूस पैशानं जरी गरीब असला तरी मनानं श्रीमंत हवा आणि तू त्याचं जिवंत उदाहरण आहेस. मनानं खूप श्रीमंत आहेस भावा…” असं म्हटलं आहे.

सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात त्याच्या स्वभावातून आणि युक्तीने टास्क खेळून अनेकांची मने जिंकली. त्याने या घरात नेहमीच मोठ्यांचा आदर केला. साधा आणि सरळ स्वभाव असल्यानेच तो लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

सूरजच्या पोस्टवरील कमेंट्स

हेही वाचा : अनिरुद्धच्या भूमिकेसाठी मिलिंद गवळी ‘असा’ करायचे मेकअप; शेअर केला ‘आई कुठे काय करते’च्या सेटवरचा व्हिडीओ

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेवेळी सूरज चव्हाणला मुख्य भूमिकेत घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा, कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली होती. त्यांच्या ‘झापूक झुपूक’ नावाच्या चित्रपटात सूरज मुख्य भूमिकेत झळकणार आहे. केदार शिंदेंनी ही घोषणा केल्यानंतर चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.