Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व सध्या दणक्यात सुरू आहे. या कार्यक्रमाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून शोला टीआरपी देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यंदा रितेश देशमुख या कार्यक्रमाचं होस्टिंग करत आहे. यावर्षी हा शो पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. यामागील कारण म्हणजे, घरात जान्हवी-निक्की यांनी काही ज्येष्ठ सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्याच आठवड्यात निक्कीने वर्षा उसगांवकरांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली होती. यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने तिची चांगलीच कानउघडणी केली होती. तरीही, ‘ए’ टीमच्या वागणुकीत काहीच बदल झालेला नाही.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात जान्हवी किल्लेकरने पंढरीनाथच्या अभिनयातील करिअरवर बोट ठेवत त्याचा अपमान केल्याचं पाहायला मिळालं. “हे लोक सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात तोंडासमोर येऊन बोलण्याचा दम नाहीये. यांना फक्त अ‍ॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत.” असं वक्तव्य जान्हवीने केलं आहे. तर, निक्कीने देखील पॅडीला ‘जोकर’ म्हटलं होतं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi- Video: “तुझ्यासाठी अर्ध्या रात्री, शूटिंगमधून पण पळत येईन…”, सूरजला राखी बांधत निक्कीने दिलं वचन; नेटकरी म्हणाले, “खोटारडी…”

जान्हवी-निक्कीच्या या वागणुकीबद्दल सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. नेटकऱ्यांसह मराठी कलाकार यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया देत आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झालेली स्पर्धक व अभिनेत्री योगिता चव्हाणच्या पतीने यासंदर्भात पोस्ट शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सौरभची पोस्ट चर्चेत

सौरभ त्याच्या पोस्टमध्ये लिहितो, “आपण काय बोलतोय? कोणाला कितपत कोणत्या थराला जाऊन बोलतोय? आणि मुळात ‘कोणाला’ बोलतोय? याचं तरी भान असावं. आता पुन्हा शनिवारी खाली मान टाकून गालातल्या गालात हसून सॉरी म्हणून मोकळं व्हायचं…इतकंच काय ते होणार का?”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : अरबाज कॅप्टनपद सोडणार का? ‘बिग बॉस’च्या घरात मोठा ट्विस्ट! प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “गर्वाचं घर नेहमी खाली…”

योगिता चव्हाणचा पती सौरभची पोस्ट ( Bigg Boss Marathi )

सौरभप्रमाणे जान्हवीने केलेल्या या वक्तव्यावर विशाखा सुभेदार, अभिजीत केळकर, सिद्धार्थ जाधव, सुरेखा कुडची अशा अनेक कलाकारांनी भाष्य केलं आहे. दरम्यान, आता भाऊच्या धक्क्यावर यासंदर्भात रितेश जान्हवीची कशी शाळा घेणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi yogita chavan husband saorabh chougule post on janhavi and nikki behaviour sva 00