Bigg Boss Marathi Season 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला नुकताच पहिला कॅप्टन मिळाला आहे. हा बहुमान अंकिता वालावलकरने पटकावला आहे. अंकिताच्या कॅप्टन होण्यामागे योगिता चव्हाणचा मोठा हातभार आहे. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ या कार्यात योगिताने आपल्या मैत्रिणीला खंबीरपणे साथ दिली. ती शेवटपर्यंत अडून राहिली अन् योगिताने टास्कच्या नियमानुसार सर्वात आधी आसन ग्रहण केलं यामुळे अंकिता विजयी झाली.

‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडले आहेत. एका बाजूला निक्की अन् तिची टीम तर, दुसऱ्या बाजूला अभिजीतची टीम आहे. अभिजीत आणि अंकिताने पहिल्याच फेरीत बाजी मारल्याने जान्हवी अन् अरबाज प्रचंड संतापले होते. या दोघांनी घरातल्या इतर स्पर्धकांबद्दल अपशब्द वापरले. एवढेच नव्हे तर आर्याने निक्की-जान्हवीवर टास्क दरम्यान मारहाण केल्याचा आरोप केला आहे. कॅप्टनसीच्या टास्कदरम्यान घरातलं एकूण वातावरण प्रचंड तापलेलं होतं. अशातच शेवटी अंकिताने बाजी मारली. अर्थात जिंकल्यावर तिने याचं श्रेय योगिताला देखील दिलं. परंतु, विरोधी टीमने वापरलेल्या चुकीच्या भाषेबद्दल या टास्कमध्ये संचालक असलेल्या वर्षा उसगांवकरांनी देखील नाराजी व्यक्त केली.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
husband wife conversation home report joke
हास्यतरंग : आईच्या घरी…
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
husband and wife conversation another woman search joke
हास्यतरंग : माझ्यासारखी…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हे लोक घरातले गुंड…”, प्रसिद्ध निर्मात्यांनी जान्हवीसह वैभव-अरबाजला सुनावलं; म्हणाले, “अतिशय वाईट…”

योगिता चव्हाणच्या पतीची Bigg Boss Marathi बद्दल पोस्ट

‘बिग बॉस’च्या या भागावर योगिता चव्हाणचा नवरा म्हणजेच अभिनेता सौरभ चौघुलेने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने अपशब्द वापरणाऱ्या स्पर्धकांसाठी खरमरीत पोस्ट केली आहे. “लायकी, भीक अशी घाणेरडी भाषा वापरली जाते… खरंच हा कुटुंबासह पाहता येणारा कार्यक्रम आहे का?” असा सवाल अभिनेत्याने त्याच्या पोस्टमधून केला आहे.

प्रसिद्ध निर्माते संदीप सिंकद यांनी देखील “अरबाज, वैभव आणि जान्हवी घरातले गुंड आहेत” अशी टीका केली आहे. तर, अभिनेता पुष्कर जोगने वर्षा, पंढरीनाथ, सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “फॉरेनची पाटलीण मस्तच…”, रांगडा गडी पडलाय परदेसी गर्लच्या प्रेमात? पाहा नवीन प्रोमो…

bigg boss marathi
Bigg Boss Marathi : सौरभ चौघुलेची पोस्ट

दरम्यान, अंकिता ‘बिग बॉस’च्या घराची कॅप्टन झाल्याने ती या आठवड्यात नॉमिनेशनपासून सेफ आहे. आता पुढच्या भागात नॉमिनेशन टास्क पार पडेल. यावेळी घरातून बेघर होण्यासाठी कोण नॉमिनेट होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader