Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तिसऱ्या आठवड्यात डबल एविक्शन झालं. योगिता चव्हाण व निखिल दामले या दोन सदस्यांनी घराचा निरोप घेतला. यापैकी योगिताने दुसऱ्याच आठवड्यात ‘बिग बॉस’कडे घरी जाण्याची मागणी केली होती. घरातील वाद, भांडणं या गोष्टी अभिनेत्रीला सहन होत नव्हत्या. अखेर योगिताने नुकतीच ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतली आहे. बाहेर आल्यावर तिने अनेक गोष्टींबाबत खुलासे केले आहेत. योगिताला फ्रेंच फ्राइस टास्क खेळताना दुखापत होऊन, निक्की-जान्हवीने तिला या टास्क दरम्यान अत्यंत चुकीची वागणूक दिली होती असा दावा नेटकऱ्यांसह योगिताच्या चाहत्यांनी केला होता. याबाबत ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना योगिताने आपलं मत मांडलं आहे.
तुझ्या मते सर्वात वाईट टास्क कोण खेळतं? या प्रश्नावर योगिता ( Yogita Chavan ) म्हणाली, “जान्हवी आणि निक्की कारण, मी आतमध्ये जेवढे टास्क खेळली… यावरून मला असं समजलं की, त्या दोघींची एनर्जी टास्कमध्ये नसते. त्यांची एनर्जी ही बोलण्यात असते. समोरच्याला टार्गेट करणं, लक्षविचलित करणं हा त्यांच्या खेळण्याचा एक भाग आहे. एखाद्याचं लक्षविचलित करणं हा मुद्दा मी समजू शकते पण, एखाद्याला किती वाईट बोलायचं? याची मर्यादा असते.”
हेही वाचा : “चुकीचे शब्द, लायकी काढणं…”, घराबाहेर आल्यावर योगिताची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “वर्षाताईंना खूप टार्गेट केलं”
Bigg Boss Marathi : निक्की-जान्हवीबद्दल काय म्हणाली योगिता?
“मलाही शेवटच्या टास्कमध्ये लागलं होतं… अर्थात त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करते. पण, कपडे खेचणं हे कितपत योग्य आहे? बरं कपडे खेचणारी पण मुलगीच आहे… या गोष्टी अतिशय वाईट होत्या. माझा गळा आवळला जात होता. तिला त्याची काहीच पडली नव्हती. बरं मी तिचा ड्रेस खेचला असता पण, मी तसं करू शकत नव्हते. कारण, माझ्या तत्त्वात ते बसतच नाही. मनात कुठेतरी मला वाटलं की, मुद्दाम कदाचित तिने तसे कपडे घातले असावेत जेणेकरून मी ते खेचू शकणार नाही…आणि जरी मी खेचलं असतं तरी आरोप माझ्यावर आला असता. याला ‘डर्टी गेम’ म्हणतात आणि अशा प्रकारचा ‘डर्टी गेम’ निक्की आणि जान्हवी खूप खेळतात.” असं योगिताने ( Yogita Chavan ) सांगितलं.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “फ्रेंच फ्राइसचा टास्क सुरू असताना ती माझे कपडे खेचत होती आणि वरून आर्या मला म्हणाली तू पण खेच तेव्हा माझ्या तोंडातून आपसूकच निघालं की, मी असं खेळू शकत नाही. आर्या तेव्हा माझ्यावर चिडली कारण, ती मला सपोर्ट करत होती. एकंदर काय तर शोमध्ये तुम्ही खोटं वागू शकत नाही. तुम्ही जसे असता, तसे या शोमध्ये दिसता. माझा मूळ स्वभावच असा आहे त्यामुळे मी शोमध्ये खोटं वागू शकले नाही.”
हेही वाचा : देशमुखांच्या घरचं रक्षाबंधन! जिनिलीयाने दाखवली खास झलक; लाडक्या पुतणीसाठी लिहिली खास पोस्ट
घरात कोणाचे खरे चेहरे दिसणं अजून बाकी आहे यावर योगिता म्हणाली, “घन:श्यामचा खरा चेहरा दिसतोच आहे…आणि वैभव. खरंतर मला वैभव खूप चांगला स्पर्धक वाटला होता. पण, तो खूप निराशा करतोय. माझं त्याच्याशी आत थोडंफार बोलणं झालंय. वैभव त्या ग्रुपला पूर्णपणे शरण गेलाय जे त्याने नाही केलं पाहिजे. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मलाही समजलं की, हे लोकांना अजिबात आवडत नाहीये आणि खरंच प्रेक्षक खरं-खोटं लगेच ओळखतात. मला जेवढ्या गोष्टी आत राहून समजल्या नसतील, त्या प्रेक्षकांना बाहेर फक्त शो पाहून समल्या आहेत.” असं स्पष्ट मत योगिताने ( Yogita Chavan ) मांडलं आहे.