‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आणि लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादव नेहमी चर्चेत असतो. कुठल्या ना कुठल्या प्रकरणात एल्विशचं नाव असतं. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय युट्यूबर, अभिनेता पूरव झाने एल्विशवर आरोप लावला होता. एल्विश यादवच्या चाहत्यांकडून धमकी येत असल्यामुळे दोन महिने एक्सवरील अकाउंट बंद करावं लागलं होतं, असा आरोप पूरव झाने केला होता. त्यानंतर आता एल्विश एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. एल्विशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एल्विश यादवने सांगितलं आहे की, त्याला आलिया भट्टबरोबर लग्न करायचं होतं. ती त्याला खूप आवडते. पण, आता तिचं लग्न झालं असून एक मुलगी आहे, असं एल्विश म्हणाला. तसंच त्याने यावेळी रणबीर कपूरची माफी मागितली. नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या…

एल्विश यादवचा हा व्हायरल व्हिडीओ त्याच्याच पॉडकास्टमधील आहे. या पॉडकास्टमध्ये अभिनेता प्रतीक सहजपाल उपस्थित राहिला होता. यावेळी एल्विश प्रतीकला विचारतो की, तुझी आवडती अभिनेत्री कोण आहे? तेव्हा प्रतीक म्हणतो, “आलिया भट्ट. ती खूप चांगली अभिनेत्री आहे.” त्यानंतर एल्विश लगेच म्हणाला की, मलाही आलिया आवडते. पण आता तिचं लग्न झालं, मुलगी आहे. तेव्हा प्रतीक म्हणाला, “मला काही त्याचा फरक पडत नाही. मला कुठे तिच्याशी लग्न करायचं होतं. ती तर चांगली अभिनेत्री आहे.” मग एल्विश म्हणाला, “मला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण आता तिचं लग्न झालं आहे. अरे हा विषय आपण का काढला? रणबीर भावा माफ कर.”

दरम्यान, एल्विश यादवच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचं झालं तर, २०२३मध्ये त्याच नाव कृति मेहराशी जोडलं गेलं होतं. पण कृतिबरोबरच्या डेटिंगच्या अफवा असल्याचं एल्विशने सांगितलं. तेव्हा एल्विश म्हणाला होता, “माझी लेडी लव्ह पंजाबमध्ये पंजाबमध्ये राहते आणि ती सोशल मीडियावर सक्रिय नसते.” यावेळी एल्विशने गर्लफ्रेंडचं नाव गुपित ठेवलं होतं. सध्या एल्विश ‘लाफ्टर शेफ’च्या दुसऱ्या पर्वात पाहायला मिळत आहे.