‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता आणि लोकप्रिय युट्यूबर एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा जयपूरमधील एका रेस्टॉरंटमधला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एल्विश एका व्यक्तीला जोरात कानशिलात लगावताना दिसला होता. यामुळे काहींनी त्याला ट्रोल केलं तर काहींनी त्याचं समर्थन केलं. त्यानंतर आता एल्विशचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात त्याने रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष दिल्याच्या आरोपावर मोठं वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एल्विशवर रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवठा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. अलीकडेच याप्रकरणाचे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून अहवाल आले. ज्यातून रेव्ह पार्टीच्या नमुन्यांमध्ये सापाचं विष असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे एल्विशवर कारवाई होण्याची टांगती तलवार आहे. पण अशातच त्याने याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा – आपली यारी लय भन्नाट हाय! सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत आपल्या पतीसह मेघा धाडेच्या नव्या व्हिलावर सुट्ट्या करतायत एन्जॉय, पाहा व्हिडीओ

एल्विशचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो माध्यमांवर निशाणा साधत म्हणाला, “रेव्ह पार्टीमध्ये एल्विश यादव कुठे होता? पोलिसांनी हे सांगितलं नाही. मूळात मी पोलिसांना सापडलोच नाही, कारण मी मुंबईत होतो. पीएफए गुगल करालं तर तुम्हाला समजेल ते नियम काय आहेत. कुठल्याही सामान्य व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल केला जातो आणि मग त्यांच्याकडून केस मागे घेण्यासाठी पैसे मागतात. त्यामुळे आता हे सिद्ध करू दाखवा की, मी तिथे होतो आणि ती माझी रेव्ह पार्टी होती. जर हे सिद्ध झालं तर मी नग्न होऊन नाचेन.”

हेही वाचा – Video: साखरपुड्यातला प्रथमेश परबचा भावाबरोबरचा भन्नाट डान्स पाहिलात का? अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ गाण्यावर थिरकले

दरम्यान, एल्विशचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. व्लॉग, व्हिडीओच्या जोरावर त्याने कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहे. माहितीनुसार, एल्विशचं नेटवर्थ २ कोटी रुपये असू शकतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss ott 2 winner elvish yadav statement about rave party snake venom allegation video viral pps