छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ नेहमीच चर्चेत असतो. या बिग बॉसच्या घरात अनेक जोड्या जुळतात. ज्या घराबाहेर पडल्यानंतरही आणखी दृढ झालेल्या दिसतात. तर काहींचे नाते मात्र बाहेर पडताच संपुष्टात येते. अशीच एक जोडी बिग बॉसच्या ११व्या पर्वात चांगलीच गाजली होती; ती म्हणजे पुनीश शर्मा व बंदगी कालराची. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर या दोघांचा नातं चांगलं घट्ट झाल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे चाहत्यांना देखील पुनीश-बंदगीच्या लग्नाची उत्सुकता होती. परंतु आता बंदगीने पुनीशबरोबर ब्रेकअप झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर नुकतीच शेअर केली आहे.
बंदगी कालराने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “मी आणि पुनीशने आपल्या सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आतापर्यंत जो वेळ एकमेकांबरोबर घालवला, तो नेहमी लक्षात राहिलं. आम्ही आयुष्यात पुढे जे काही करायचा निर्णय घेऊ त्यात एकमेकांना प्रेम व साथ देऊ. मी तुम्हाला विनंती करेन की, आमच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि अजिबात तर्क-वितर्क लावू नका.”
हेही वाचा – Video: उत्साहाच्या भरात अल्लू अर्जुनकडून झाली चूक? ‘पुष्पा-२’चा डायलॉग झाला लीक
हेही वाचा – अभिनेत्री मौनी रॉय ९ दिवसांनंतर हॉस्पिटलमधून परतली; म्हणाली, “प्रकृती…”
पुनीशने बंदगीची हीच पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पुनीश-बंदगी हे दोघे पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.
हेही वाचा – आलियाप्रमाणे पूजा व महेश भट्टही नाहीत १२ वी पास; अभिनेत्रीने केला खुलासा
दरम्यान, बंदगीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती एक इंजिनिअर आहे. बिग बॉस या शोसाठी तिने नोकरी सोडली होती. बंदगीला मॉडेल म्हणून ओळखले जाते. पण सध्या ती कंटेंट क्रिएटर व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर म्हणून जास्त लोकप्रिय आहे. तर पुनीत हा एक अभिनेता आहे.