Bigg Boss 18 Hindi Season Teaser : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची सध्या सर्वत्र चर्चा चालू झाली आहे. अशातच आता मेकर्सनी ‘बिग बॉस’च्या हिंदी सीझनची घोषणा केली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘बिग बॉस’ हिंदीचा अठरावा सीझन येणार आहे. यंदा देखील या शोचं होस्टिंग बॉलीवूडचा भाईजान सलमान खान करणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीझरमधून नव्या सीझनबद्दल अनेक हिंट्स देण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स वाहिनी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून ‘बिग बॉस’च्या अठराव्या सीझनचा पहिला टीझर शेअर करण्यात आला आहे. या टीझरला “टाइम का तांडव लेकर आएगा ‘बिग बॉस’ मैं एक नया ट्विस्ट” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. यावरून यंदाची थीम ‘टाइम का तांडव’ असेल हे स्पष्ट झालेलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi Video : “साडी नेसणारी पोरगी पाहिजे”, ‘बिग बॉस’ने मैत्रिणीबद्दल विचारताच सूरज चव्हाण लाजला! अभिजीत म्हणाला, “अरे…”

Bigg Boss 18 : पहिला प्रोमो प्रदर्शित

‘कलर्स वाहिनी’ने शेअर केलेल्या पहिल्या प्रोमोमध्ये बॅकग्राऊंडला सलमान खानचा आवाज ऐकू येत आहे. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या ‘दबंग’ अंदाजात नव्या पर्वाचं होस्टिंग करण्यास सज्ज झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, शो नेमका केव्हा सुरू होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच याबद्दल अधिकृतरित्या घोषणा करण्यात येणार आहे. पहिला टीझर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. आता यंदा ‘टाइम का तांडव’ मध्ये काय पाहायला मिळणार याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “कभी कपडे फाडे गये, कभी नोचा गया…”, घराबाहेर येताच आर्याने रॅपमधून मांडलं रोखठोक मत! एकदा ऐकाच…

हेही वाचा : ठरलं तर मग : सायलीच खरी तन्वी! अर्जुनने पाहिली बायकोच्या पायावरची जन्मखूण; प्रियाचा खोटेपणा उघड होणार, पाहा प्रोमो

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सलमान खानने नव्या सीझनच्या ( Bigg Boss 18 ) प्रोमोचं शूटिंग केलं आहे. सलमानचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असून तो शूटिंगला आल्याचं कळताच चाहत्यांची सेटच्या बाहेर गर्दी जमली होती. आता नव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार आणि अठराव्या सीझनमध्ये घरात काय काय ट्विस्ट असतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss season 18 announcement salman khan will host the show watch first promo sva 00