स्वतःचं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण अविरत मेहनत करत असतात. मुंबई सारख्या मायानगरीत घर घेताना अनेकांची नाकीनाऊ येतात. पण, ‘बिग बॉस’ विजेत्या अभिनेत्रीने मुंबईत एक नव्हे तर तीन घरं खरेदी केली आहेत.

मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात करणारी हिंदी ‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वाची विजेती गौहर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत घरं घेतली आहेत. तिने एकूण तीन घरं घेतल्याचं समोर आलं आहे; ज्याची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हालं.

Phulmoni Das
Phulmoni Das: १३ तासांच्या लैंगिक यातना; ‘ती’चा मृत्यू ठरला भारतीय संमती वयाच्या कायद्यासाठी निमित्त!
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
zee marathi announces new reality show chal bhava cityt
गावचा रांगडा गडी अन् शहरातील…; ‘झी मराठी’वर सुरू होणार नवीन रिअ‍ॅलिटी शो! नाव आहे खूपच हटके, प्रोमो आला समोर…
Survey News
आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपा एनडीए ३०० पार, पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती? ‘हा’ सर्व्हे नेमकं काय सांगतो?
Actor Chiranjeevi on Gender Remark| Actor Chiranjeevi on Grandson
Actor Chiranjeevi on Grandson : “वारसा पुढे न्यायला मुलगा हवा”, प्रसिद्ध अभिनेत्याचं ‘लिंगभेदी’ विधान; राजकीय नेत्यांनी फटकारलं
actress Parvati Nair marries Aashrith Ashok in a traditional South Indian ceremony
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केलं लग्न, थाटात पार पडला विवाहसोहळा, ८ दिवसांपूर्वी केलेला साखरपुडा!
Chinese Men And Women Dont Want To Get Married
‘या’ देशात तरुण-तरुणी लग्न करायला तयारच होईनात; काय आहेत कारणं?
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

‘टाइम नाउ’च्या वृत्तानुसार, गौहर खानने मुंबईतील वर्सोवा येथे तीन आलिशान घरं खरेदी केली आहेत. ज्यामधील दोन घरं गौहरने पतीच्या साथीने घेतली आहेत. गौहरची ही तिन्ही घरं शिव कुटरी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड नावाच्या एका बिल्डिंगमध्ये आहेत. येथे अभिनेत्रीला पार्किंगची सुविधादेखील देण्यात आली आहे.

गौहर खानच्या घरांची किंमत किती?

गौहर खानने जी तीन घरं खरेदी केली आहेत, त्यामधील एका घराची किंमत २.८० कोटी रुपये आहे. या घराची ती एकटी मालकीन आहे. या घरासाठी अभिनेत्रीने १३.९८ लाख रुपयात स्टँप ड्युटी आणि ३० हजार रुपयांत रजिस्ट्रेशन केलं आहे. याशिवाय अभिनेत्रीने जी दोन घरं घेतली आहेत, त्यामध्ये पती जैद दरबारचादेखील हक्क आहे. ही दोन घरं ७.३३ कोटींमध्ये कपलने खरेदी केलं आहेत. या दोन घरांसाठी गौहर आणि जैदने ३० हजार रजिस्ट्रेशनसाठी आणि ४३.९७ लाख स्टँप ड्युटीसाठी मोजले आहेत.

दरम्यान, गौहर खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, रवि दुबे आणि सरगुन मेहताचं नवं प्लॅटफॉर्म ‘ड्रीमियाता ड्रामा’ यावरील ‘लवली लोला’ या शोमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसंच गौहर ‘फौजी २’मध्ये कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. ४१ वर्षीय या अभिनेत्रीला एक मुलगा आहे; ज्याच्याबरोबर ती नेहमी दिसत असते. गेल्यावर्षा अखेरीस गौहर खानने आलिशान गाडी खरेदी केली होती.

Story img Loader