स्वतःचं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण अविरत मेहनत करत असतात. मुंबई सारख्या मायानगरीत घर घेताना अनेकांची नाकीनाऊ येतात. पण, ‘बिग बॉस’ विजेत्या अभिनेत्रीने मुंबईत एक नव्हे तर तीन घरं खरेदी केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात करणारी हिंदी ‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वाची विजेती गौहर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत घरं घेतली आहेत. तिने एकूण तीन घरं घेतल्याचं समोर आलं आहे; ज्याची किंमत वाचून तुम्ही थक्क व्हालं.

‘टाइम नाउ’च्या वृत्तानुसार, गौहर खानने मुंबईतील वर्सोवा येथे तीन आलिशान घरं खरेदी केली आहेत. ज्यामधील दोन घरं गौहरने पतीच्या साथीने घेतली आहेत. गौहरची ही तिन्ही घरं शिव कुटरी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड नावाच्या एका बिल्डिंगमध्ये आहेत. येथे अभिनेत्रीला पार्किंगची सुविधादेखील देण्यात आली आहे.

गौहर खानच्या घरांची किंमत किती?

गौहर खानने जी तीन घरं खरेदी केली आहेत, त्यामधील एका घराची किंमत २.८० कोटी रुपये आहे. या घराची ती एकटी मालकीन आहे. या घरासाठी अभिनेत्रीने १३.९८ लाख रुपयात स्टँप ड्युटी आणि ३० हजार रुपयांत रजिस्ट्रेशन केलं आहे. याशिवाय अभिनेत्रीने जी दोन घरं घेतली आहेत, त्यामध्ये पती जैद दरबारचादेखील हक्क आहे. ही दोन घरं ७.३३ कोटींमध्ये कपलने खरेदी केलं आहेत. या दोन घरांसाठी गौहर आणि जैदने ३० हजार रजिस्ट्रेशनसाठी आणि ४३.९७ लाख स्टँप ड्युटीसाठी मोजले आहेत.

दरम्यान, गौहर खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, रवि दुबे आणि सरगुन मेहताचं नवं प्लॅटफॉर्म ‘ड्रीमियाता ड्रामा’ यावरील ‘लवली लोला’ या शोमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसंच गौहर ‘फौजी २’मध्ये कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. ४१ वर्षीय या अभिनेत्रीला एक मुलगा आहे; ज्याच्याबरोबर ती नेहमी दिसत असते. गेल्यावर्षा अखेरीस गौहर खानने आलिशान गाडी खरेदी केली होती.