बिग बॉस या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता शिव ठाकरे हा सध्या चांगला चर्चेत आहे. शिव हा हिंदी बिग बॉस सीझन १६ मध्ये सहभागी झाला आहे. यावेळी त्याने सर्व प्रेक्षकांची पहिल्या दिवसापासूनच मनं जिंकली आहेत. शिव ठाकरेने बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जिंकले होते. या पर्वात सर्वाधिक चर्चा अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव ठाकरेच्या लव्हस्टोरीची रंगली. त्या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे बिग बॉसला चार चांद लागले. त्या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र पाहायला मिळाल्या. मात्र काही महिन्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आता शिवने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे.
शिव ठाकरे हा बिग बॉसच्या हिंदीच्या १६ व्या पर्वात खेळताना दिसत आहे. यावेळी तो खरेपणाने आणि प्रामाणिकपणे खेळत असल्याने त्याच्या सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. नुकतंच शिवने त्याच्या गर्लफ्रेंड आणि खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. यावेळी तो म्हणाला, “माझं आयुष्य हे ओपन बुक आहे.”
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली
बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला अनेक गोष्टींबद्दल विचारण्यात आले. यावेळी तू घरात कसा खेळणार आहे? सगळ्या चॅलेंजला कसे सामोरी जाणार याबद्दलही त्याला विचारले होते. त्याचे त्याने स्पष्टपणे उत्तर दिले.
“मी स्पष्ट विचार करणारा व्यक्ती आहे. माझं आयुष्य ओपन बुक आहे. माझ्या आयुष्यातील कोणत्याच गोष्टी मी लपवून ठेवलेल्या नाहीत. माझ्या आतापर्यंत १६९ गर्लफ्रेंड होत्या, याचा खुलासा मी बिग बॉसकडे आधीच केला आहे. मी माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडला कसा भेटलो, कोणाला सरप्राईज दिले, याबद्दलही मी सांगितले आहे. मी ओपन बुकप्रमाणे आहे. मी माझे आयुष्यही तशाच प्रकारे जगतो. त्यामुळे तुम्ही मला काहीही विचारा मी तुम्हाला सहज उत्तर देईन”, असे शिव ठाकरे म्हणाला.
आणखी वाचा : Video : “माझं नाव शाकाल नाही….” अभिनेते वैभव मांगले संतापले; पाहा नेमकं काय घडलं?
दरम्यान सध्या शिव हा बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात सदस्य म्हणून सहभागी झाला आहे. शिव ठाकरे बिग बॉस हिंदीमध्ये गेल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सलमान खानने त्याचे कौतुक केले होते. तू चांगलं खेळतोस असं म्हणत त्याने शिवला काही टीप्सही दिल्या होत्या. त्यानंतर मात्र शिव ठाकरे सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असल्याचे पाहायला मिळत होते.