‘बिग बॉस हिंदी’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची चांगलीच हवा पाहायला मिळाली. शिव ठाकरेची बिग बॉस १६ ची ट्रॉफी थोडक्यात हुकली असली तरी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात मात्र आपले अढळ स्थान निर्माण केले. बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापची सातत्याने चर्चा रंगताना दिसली. शिव ठाकरेने नुकतंच त्याच्या हातावरील टॅटूबद्दल भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली. शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप गाजली. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. शिव-वीणा या दोघांनीही सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दलची कबुली दिली होती. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे बिग बॉसला चार चांद लागले होते. बिग बॉस मराठीच्या घरात असताना शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. त्याच्या हातावर अजूनही तो टॅटू आहे. नुकताच त्याला हा टॅटू काढून टाकण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर शिवने उत्तर दिले.
आणखी वाचा : शिव ठाकरे आणि वीणाचा ब्रेकअप नेमका कधी झाला? समोर आली खरी तारीख 

“आपण एखाद्या कार्यक्रमासाठी आपला सगळा जोर लावतो. पण एका टॅटूमुळे आपलं नातं जगजाहीर होतं, त्याबद्दल सतत चर्चा होते, मग हा टॅटू काढून टाकावा असं का वाटलं नाही?” असे त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, “मी जे केलं ते मला ठाऊक आहे. ती व्यक्ती योग्य होती, याची मला माहिती आहे. आता आम्ही वेगळे झालो असलो तरी त्यावेळी ज्या काही गोष्टी घडल्या त्या योग्य होत्या.”

“माझ्यासाठी तो व्यक्ती योग्य होता. त्यामुळे मला हे लपवण्याची किंवा काढून टाकण्याची काही गरज नाही. माझ्या आयुष्यात जेव्हा कुणी येईल, ज्याला हे पाहून वाईट वाटेल, आवडणार नाही तेव्हा मी ते काढून टाकेन. पण मला आता त्याची काहीच अडचण नाही. मला ते खुपत नाही आणि मला त्या व्यक्तीप्रती आदर आहे. मग मी ते का लपवू?”

आणखी वाचा : “कपड्यांवरील किंमतीचा टॅग…” शिव ठाकरेचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

“जर मला बिग बॉसमध्ये येऊन कुणाबरोबर रिलेशनमध्ये यायचं असतं तर मी आधी हे काढायचा विचार केला असता. पण तसं काही नव्हतंच. बाकी माझं आयुष्य सगळ्यांसमोर आहे. मी माझ्या सगळ्या गर्लफ्रेंडबद्दल सांगतो. मी माझ्या सर्व वैयक्तिक गोष्टी सांगतो. मग लपवायची काय गरज?” असे शिव ठाकरे म्हणाला.

दरम्यान शिव ठाकरेचे हे उत्तर ऐकून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. सध्या सोशल मीडियावर शिव ठाकरे हा सर्वाधिक चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकजण त्याचे कौतुक करतानाही दिसत आहे. तर काही जण शिवला पाठिंबा देतानाही पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss shiv thakare talk about removing veena jagtap tattoo from hand nrp