मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप आणि अभिनेता शिव ठाकरे हे दोघेही कायमच चर्चेत असतात. शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली. शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप गाजली. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. पण काही महिन्यांनी त्या दोघांचा ब्रेकअप झाला. आता ते दोघेही एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आले आहे.
नुकतंच वीणा जगतापने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात वीणाने छान चॉकलेटी रंगाची साडी नेसत फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर तिने गजरा, बांगड्या, ठूशी असा पारंपारिक लूकही केला आहे. यात तिच्या भांगेत कुंकू भरल्याचेही पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली
वीणाने हा फोटो शेअर करत “प्यार हुआ,,,,इकरार हुआ” असे म्हटले आहे. त्याबरोबर तिने दोन हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.
तर दुसरीकडे वीणाचा एक्स बॉयफ्रेंड शिव ठाकरेनेही त्याच वेळी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शिवने चॉकलेटी रंगाचे ब्लेझर परिधान केले आहे. याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : पालकांच्या प्रायव्हसीबद्दल हेमांगी कवीचे बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाली…
वीणा आणि शिवने एकाच वेळी एकाच रंगाचे कपडे परिधान करत फोटो शेअर केल्याने चर्चांना उधाण आले आहे. अनेक नेटकऱ्यांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली आहे.
“क्या बात है, शिव-वीणा ट्वीनिंग करत आहेत”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर काहींनी “शिवची आठवण आली का”, असा प्रश्न तिला विचारला आहे. तर एकाने तिला “शिवबरोबर पॅचअप कर ना? तुमची जोडी खूप सुंदर आहे”, असे म्हटले आहे.