टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ नेहमीच चर्चेत असतो. सुरुवातीला फक्त हिंदी ‘बिग बॉस’ होतं. पण आता इतर भाषांमध्ये ‘बिग बॉस’ पाहायला मिळत आहे. अलीकडेच हिंदी ‘बिग बॉस’चं १८वं पर्व जोरदार सुरू झालं आहे. अशातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा एमएमएस लीक झाला आहे. त्यामुळे सध्या या अभिनेत्रीचं नाव ट्रेंड होतं असून तिला ट्रोल केलं जात आहे. पण, या ट्रोलर्सना अभिनेत्रीने सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री ओविया हिचा प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच ओवियाला नेटकरी ट्रोल करत असून तिच्या पोस्टवर वाईट प्रतिक्रिया दिल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या कुर्त्यांमध्ये क्रॉस फिंगर करताना दिसत होती. ओवियाच्या या शेवटच्या पोस्टवर नेटकरी वाईट प्रतिक्रिया देत आहेत. काही जण ओवियाचा डीप फेक व्हिडीओ असल्याचं म्हणत आहेत. तर काही जण व्हिडीओ खरा असल्याचं म्हणत आहेत.

हेही वाचा – Video : ‘बिग बॉस १८’मध्ये आला मोठा ट्वीस्ट, गुणरत्न सदावर्तेंनंतर आणखी एक सदस्य घराबाहेर, पाहा प्रोमो

तिच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, मॅडम १७ सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यावर अभिनेत्री म्हणाली, “एन्जॉय.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “कोणत्या व्हिडीओबद्दल बोललं जात आहे?” यावर अभिनेत्री म्हणाली की, “मला बोलू द्या.”

ओविया कोण आहे?

२००७मध्ये ‘कंगारू’ चित्रपटातून ओवियाने मल्याळम सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर तिला मल्याळम आणि तमिळ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाल्या. तिचा ‘कलावणी’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट कन्नडमध्ये प्रदर्शित केला होता. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत यश मिळाल्यानंतर ओवियाने २०१५मध्ये ‘ये इश्क सरफिरा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात मोहम्मद अब्दु्ल्ला, नैना असवाल आणि राजकुमार कनैजियासारखे कलाकार होते. पण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला पाहिजे तसं यश मिळालं नाही.

हेही वाचा – Bigg Boss 18 : एक, दोन नाही तर १० सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, ‘बिग बॉस’च्या घरात दुसऱ्या आठवड्यात मोठा गोंधळ

त्यानंतर ओविया ‘बिग बॉस तमिळ’च्या पहिल्या पर्वात झळकली. यामुळे ती अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली. या पर्वाचा विजेता आरव आणि ओविया यांचं नातं खूप चर्चेत आलं होतं. ‘बिग बॉस तमिळ’च्या पहिल्या पर्वातून ओविया मधेच बाहेर पडली होती. पण, तिने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ओविया शेवटची ‘बूमर अंबर’ चित्रपटात झळकली होती. येत्या काळात ती ‘संभवम’ आणि ‘राजा भीम’मध्ये पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss tamil fame oviya private video leaked pps