‘बिग बॉस १६’ सध्या रंजक वळणावर आहे. ‘बिग बॉस’च्या १६व्या सीझनमध्ये प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट अनुभवायला मिळाले. या सीझनची खासियत म्हणते ‘बिग बॉस’ स्वतः विशेष टिपणी करत सदस्यांबरोबर हा खेळ खेळत आहेत. पण जर ‘बिग बॉस’ स्वतः घरामध्ये आले तर… हो असंच आता या सीझनच्या नव्या भागामध्ये घडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – गरोदरपणातच नवऱ्याने आईला करिश्मा कपूरच्या कानाखाली मारण्यास सांगितली, अभिनेत्रीही मागे हटली नाही अन्…

‘बिग बॉस’च्या घरामध्ये ऐकू येत असल्याचा आवाज नेमका कोणाचा? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. विजय विक्रम सिंह हे ‘बिग बॉस’चा आवाज आहेत. विजय सिंह यांनीच आता घरामध्ये एण्ट्री केली आहे. आता या शोमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.

येत्या भागामध्ये घरात आलेल्या पाहुण्यांकडे सदस्यांना दुर्लक्ष करायचं आहे. घरातील खाण्याचं सामान परत मिळवायचं असेल तर सदस्यांना हे काम करावं लागणार आहे. विजय सिंहही पाहुणे म्हणूनच घरात प्रवेश करतात. पण त्यांना घरातील सदस्यांनी ओळखलं की नाही हाही मोठा प्रश्न आहे.

आणखी वाचा – Video : भरपार्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा नवऱ्यासह Lip Lock करतानाचा व्हिडीओ समोर, रोमान्सही केला अन्…

विक्रम सिंह घरात आल्यानंतर सुम्बूल तौकीरला तिच्या वडिलांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवत आहेत. विक्रम यांनी ‘बिग बॉस’च्या जवळपास १४ सीझनला त्यांचा आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजाचेही आज हजारो चाहते आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss voice artist vijay vikram singh enter in the house first time watch video kmd