‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वामुळे शिव ठाकरे प्रसिद्धीच्या झोतात आला. या पर्वाचं विजेतेपद शिवने पटकावलं. त्याने कलाक्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आता ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफीही शिवच्याच हातात असावी यासाठी त्याचे चाहते, कुटुंबिय प्रार्थना करत आहेत. तर मराठी कलाकारांनीही शिवला वोट करा असं सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं आहे.
शिव ठाकरेसाठी रस्त्यावर तुफान गर्दी
शिवला कलाक्षेत्र तसेच राजकीय क्षेत्रामधून पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबरीने शिवच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसाठी तरुण मंडळींनी रस्त्यावर बाईक रॅली काढली असल्याचं दिसत आहे. तर शिवला वोट करा असं बोलताना दिसत आहेत.
तर काही जणांच्या हातामध्ये शिवचं पोस्टर आहे. शिवला प्रेक्षकांचा व त्याच्या चाहत्यांचा अधिकाधिक पाठिंबा मिळत आहे. अवघ्या काही दिवसांवरच ‘बिग बॉस १६’चा अंतिम सोहळा आहे. आता घरामध्ये फक्त शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भानोत व अर्चना गौतम हे पाच सदस्य राहिले आहेत.
आणखी वाचा – ‘बिग बॉस १६’च्या ‘टॉप २’मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेला जागा नाही? ‘त्या’ ट्वीटनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
दरम्यान सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगत आहे. प्रियांका चौधरी व एमसी स्टॅन टॉप २मध्ये असणार अशी चर्चा आहे. ‘बिग बॉस तक’ या फॅनपेजद्वारे एक ट्वीट करण्यात आलं होतं. यावरुनच हा अंदाज लावण्यात येत आहे. आता ‘बिग बॉस’ची ट्रॉफी नेमकी कोणत्या सदस्याच्या हाती असणार? हे पाहणं रंजक ठरेल.