गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी राजकारणात प्रवेश करत आहेत. नुकताच बिग बॉस फेम अभिनेता अभिजीत केळकरनं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपाने एका महत्त्वाच्या पदी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडेची नियुक्ती केली आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…तर माझ्या आयुष्यातली सगळी माणसं उद्ध्वस्त होतील”, ‘रंग माझा वेगळा’ फेम विदिशा म्हसकर असं का म्हणाली?

अभिनेत्री मेघा धाडेनं जून महिन्यात भाजपामध्ये प्रवेश करून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मेघाने भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मेघाची चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – कुणी म्हणाले वेडे, तर कुणी म्हणाले प्रेरणादायी; अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

यासंदर्भात मेघाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून लिहिलं आहे की, “आज माझी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले. मला प्रिया ताईंनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करीन हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार….”

हेही वाचा – “‘रंग माझा वेगळा’ संपल्यानंतर …” अभिनेत्री रेश्मा शिंदे झाली भावुक, म्हणाली, “‘ही’ गोष्ट कायम…”

हेही वाचा – “किती काळ काठावर उभं राहून…” बिग बॉस फेम अभिनेत्यानं भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश; म्हणाला…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता सौरभ गोखलेनं भाजपात प्रवेश केला होता. तसेच जुलै महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, माधव देवचके या कलाकारांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp has appointed bigg boss marathi season 1 winner megha dhade to an important post pps