भाजपाचे नेते किरीट सोमय्या सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. गेल्या दोन वर्षात त्यांनी राजकारणातील अनेक मोठे नेते त्यांच्या रडारावर होते. अनिल परब विरुद्ध किरीट सोमय्या असा कलगीतुरा फारच रंगला होता. दापोली रिसॉर्ट प्रकरण चांगलंच गाजतं आहे. ‘हातोडा’ मॅन म्हणून ओळखले गेलेले किरीट सोमय्या सध्या चर्चेत आले ते ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामुळे, नुकतेच ते आपल्या पत्नीबरोबर या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात अनेक गंमतीशीर घटना घडल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भागाशी संबंधित एक प्रोमो झी वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये, किरीट सोमय्या गरबा खेळताना दिसत आहेत त्याचबरोबरीने त्यांची पत्नीदेखील त्यांना साथ देत आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘ढोलीडा’ हे गाणे कार्यक्रमात वाजताच किरीट सोमय्या गरबा खेळण्यास सुरवात करतात. त्यांच्या या गरब्याला प्रेक्षकांनी, परीक्षक स्वप्नील जोशीनेदेखील पसंती दर्शवली. तसेच आणखीन एक किस्सा त्याच्याबरोबर घडला तो म्हणजे किरीट सोमय्या हे दिवसातून चार वेळा अंघोळ करत असल्याचा खुलासा करण्यात आला. याला किरीट सोमय्या यांच्या पत्नीनेही दुजोरा दिला. यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

एकेकाळी मुंबईत ड्रायव्हर होता ‘कांतारा’चा मुख्य अभिनेता; निराश होऊन गावाला गेलं अन्…

किरीट सोमय्या यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून केली आणि इथून त्यांनी राजकरणात प्रवेश केला. विद्यार्थी चळवळीतून त भाजपात दाखल झाले. त्यांची खरी ओळख म्हणजे मुंबईतील गरबा आयोजकी अशी, मुलुंड मतदार संघातून त्यांनी आपली पहिली निवडणूक लढवली होती. पेशाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची आधी ते किचन कल्लाकर या कार्यक्रमात येऊन गेले होते, त्यांच्यबरोबरीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेदेखील होते. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील गंमती जमती १७ ऑक्टोबरच्या भागामध्ये पाहता येणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya performed garba in zee marathi serial chala hava yeu dya spg