सलमान खानचा शो ‘बिग बॉस ओटीटी २’ सध्या खूप चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री आकांक्षा पुरी आणि मॉडेल जैद हदीद यांचे किसिंग प्रकरण आहे. लाइव्ह शो दरम्यान या दोन्ही स्पर्धकांनी एकमेकांना किस केले, पण हे घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेक्षकांनाही फार आवडलेलं दिसत नाही. लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. अशातच आता भाजपा नेत्याने ट्वीट करून यावर संताप व्यक्त केला आहे.
बालकलाकार साईशा भोईरची आई पोलीस कोठडीत, तर वडील फरार; सगळी संपत्ती होणार जप्त, नेमकं प्रकरण काय?
भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले, “इथे बिग बॉसच्या नावाखाली अश्लीलतेची जत्रा सुरू आहे. बिग बॉस अश्लीलतेचे मॉडेल बनत आहे!!’ कोण होस्ट करत आहे? सलमान खान, मुलगा कोण आहे? जैद हबीब आणि मुलगी कोण? आकांक्षा पुरी. बिग बॉसच्या लाईव्ह शोमध्ये काय काय दाखवलं जातंय? मुलगा विशिष्ट समाजाचा आणि मुलगी हिंदू, समाजात कोणता संदेश दिला जात आहे? हे आजपासून नव्हे तर वर्षानुवर्षे सुरू आहे. देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या या भारतातील तरुण पिढीची कशी दिशाभूल केली जात आहे.”
सुधांशू त्रिवेदी यांनी बिग बॉसबद्दल दुसरंही ट्वीट केलंय. “तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बॉयकॉट बॉलिवूड कराल आणि लव्ह जिहादसाठी त्यांचे प्रायोजकत्व थांबेल? नाही. सगळं कसं चाललंय ??? समजून घ्या… सर्वात आधी जैदने जबरदस्तीने आकांक्षा पुरीला पकडण्याचा प्रयत्न केला, तिने नाही म्हटल्यानंतरही. नंतर त्यांना कॅमेऱ्यासमोर ४० सेकंद किस करण्याचं चॅलेंज दिलं. व्वा!! आता त्यांचा उद्देश सफल झाला!! सलमान खानने देशभरातील प्रत्येक मोबाईल आणि प्रत्येक तरुणासाठी BigBossOTT2 आणलंय! लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हा शो पाहत आहे, मी त्या व्यक्तीचे आणि कुटुंबाचे स्वागत करतो, ज्यांनी स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला बिग बॉसपासून दूर ठेवलं आहे,” असंही ते म्हणाले.
दरम्यान, ‘वीकेंड का वार’च्या एपिसोडमध्ये आकांक्षा पुरी आणि जैद हदीद यांच्या कृतीवर सलमान खान संतापला. दोघेही हे आव्हान नाकारू शकले असते. पण त्यांनी नकार दिला नाही. कारण त्यांना किस करायचे होते, असं सलमान म्हणाला. या आठवड्यात किसिंग सीननंतर कमी मतं मिळाल्याने आकांक्षा पुरी घरातून एव्हिक्ट झाली.